आठवणी दाटतात

ह्या मनाच्या सांदी कोपऱ्यात 
किती आशा लपल्या 
आठवणी कितीदा 
भावनारुपात जपल्या 

जेव्हा आठवणी दाटतात 
डोळे तेव्हा झरत 
ह्याच मग चिरकाल साठून 
मनोमन रेंगाळत 

जेव्हा हसलो मनापासून 
बालपणीच्या स्मृती 
तेंव्हा चिडलो तळापासून 
तारुण्याच्या कटु कृती

आता संध्याकाळ सुरु झाली 
आठवणीच्या सोबतीने 
अरे कितीदा पुरून उरलो 
बोलून जातात गंमतीने 

रंग माझा वेगळा 
म्हणून जीवनगाणे गाताना 
रंगल्या रात्री अशा 
अन स्वप्ने उलगडत 
विसरलो जरी सर्व म्हणाले 
अमूर्त जीवनसंचय बनत राहिल्या












- मृणाल देशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा