माझा “मिशेलिन” क्षण

समाधानाचा जन्म स्वयंपाक घरात होतो असे म्हणतात. पाककला जशी एक कला आहे तसेच ते एक शास्त्र ही आहे. “जठराग्नी शांत” करण्यापासून ते थेट “जिभेचे लाड” पुरविण्यापर्यंत पाककला अवगत असावी अशी प्रत्येक गृहिणीची इच्छा असते. हाताच्या पाचही बोटांनी पदार्थ चाखला की त्याला “चविष्ट” असे म्हटले जाते. 

पाककलेचा आणि माझा संबंध लग्नानंतरच आला. तदपश्चात, वेगवेगल्या शहरांमधे व देशांमधे राहून तिथल्या native डिशेस शिकणे जणू माझा छंदच बनून गेला. सिंगापुरला आल्यानंतर इथल्या local dishes माझ्या “रुचिरा” मध्ये समाविष्ट झाल्या. इथली पाकसंस्कृति समृद्ध असल्यामुळे बरेच काही शिकता आले. एखादी मांसाहारी पाककृति शाकाहारी कशी बनवता येईल याच्याकडे माझा कल असतो. तसेच, एखादा खाद्यपदार्थ तयार करताना आपण साचेबंद न राहता, वेगवेगळे साहित्य व कृति वापरून त्यात नाविन्य शोधण्याची देखिल मला आवड आहे. 

1 मे 2017 रोजी महाराष्ट्र मंडळ सिंगापूर (MMS) नी आयोजिलेल्या महाराष्ट्र दिन आनंद मेळावा “खाद्योत्सव” स्पर्धेमधे मला माझी पाककला सादर करण्याची सुवर्णसंधी मिळाली. वरपांगी सोपे वाटणारे नियम (आंबा किंवा कैरी हवीच) व अपेक्षा (सिंगापुरप्रेरित पाककृति) प्रत्यक्षात अव्हानात्मक होते. त्यातून परीक्षक श्री मंजूनाथ मुराळ (Michelin Star Chef), त्यामुळे कल्पकतेचा कस लागणार होता. ह्या तीनही गोष्टिंचा मेळ घालणे एक exciting challenge होते. मनात विचार आला - Tofu with Vegetables in Spicy Mango Sauce, अर्थात “सिंगापुरी लाक्सा” with a twist. २-३ वेळा घरच्यांबरोबर brainstorming sessions झाल्यावर अखेरीस ह्या dish चा निर्णय पक्का झाला. Trial sessions व fine tuning मधे रविवार कधी निघुन गेला कळळेच नाही. स्पर्धेच्या दिवशी थोडी धाकधूक होती, पण परिक्षकांबरोबर कुतूहलपूर्वक प्रश्नविनिमय झाल्यावर, त्यांना ही पाककृती आवडली असावी अशी एक आशा मनात डोकाऊन गेली. परंतु स्पर्धेत पहिले पारितोषक मिळाल्याचं जेव्हा समजलं तेव्हा आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. 

माझा परिवार, मित्रमैत्रिणी यांच्याकड़ून मिळणारे प्रोत्साहन व MMS नी दिलेली ही संधी, यांमूळे माझा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे. 

Recipe: Tofu with Vegetables in Spicy Mango Sauce

पेस्ट बनविणे:- २ शॅलट्स, ४ मोठ्या सुक्या मिर्च्या (कोमट पाण्यात भिजवुन ठेवणे), 1 stalk गवती चहा , २ candlenuts, 1 cm आलं, 3 लसणाच्या पाकळ्या,
1 चमचा धने, २ वेलदोडे, 1 चमचा करी पावडर. 

भाज्या: हिरवी व लाल ढोबळी मिर्ची, कांदा, pan-fried टोफू, बॉक-चोय.

करी: २ थाई हनी आंम्ब्यांची प्युरी, 100 ml नारळाचे दूध, मीठ, २ चमचे तेल. 

सजावट: कोथिंबीर. 

कृती: पॅन मधे तेल गरम करुन त्यात तयार केलेली पेस्ट परतावी. पेस्टचा कच्चा वास गेल्यावर त्यात 1/4 कप पाणी व नारळाचे दूध घालून एक उकळी आणावी. शेवटी अंब्याची प्युरी व भाज्या घालून शिजवून घ्यावे. भाज्या crunchy राहतील ह्याची दक्षता घ्यावी. कोथिंबीरीच्या पानांनी सजावट करावी. 

ही डीश थाई जस्मिन भाताबरोबर किंवा नूडल्स बरोबर वाढता करता येईल.
- राजश्री शैलेंद्र जोशी



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा