- कविता -

तू सखी
तू सुटका
तू जीवघेणा गुटखा

तू तेढ
तू वेड
तू नवी मुहूर्तमेढ

तू वेताळ
तू पाताळ
तू थंडगार नाताळ

तू रोगीण
तू भोगीण
तू घर नसलेली जोगीण

तू दशा
तू दिशा
तू जगण्याची आशा

तू ये
तू ने
तू सांभाळून घे
- नीतीन मोरे

1 टिप्पणी: