माझी 'कला'

नाती माणसे जोडतात. अनेकांशी मला जोडणारं असं ऐक विशेष नातं आहे ते माझं माझ्या 'कलेशी'. माझी चित्रकला ही मला मिळालेली देणगी आहे, असं मी समजते. लहानपणापासून चित्र कलेचा छंद. भवतालीचा निसर्ग, बदलते ऋतु, हे कागदावर रेखाटताना समाधान वाटे. पण व्यवसाय म्हणून कलेचा कधी विचार केला नाही. पुढे पदव्युत्तर शिक्षण, नोकरी, संसार आणी मातृत्व ह्या जबाबदाऱ्या सांभाळताना कलेचं वेड हरवून गेलं. 

१९९८ साली नवर्‍याच्या कामामुळे आमची बदली इंग्लंडला झाली. वेळ घालवायला मी पेंटिंग चालू केलं. त्या नंतर अमेरिका व सिंगापुर येथे रहावयाचा योग आला. ऋतु बदलले, जागा बदलली, पण माझी कला मात्र चालू राहिली. अमेरिकेत असताना तिथल्या ऐका Juried Art Exhibition मध्ये थोडेसे घाबरत, मी माझे पेंटिंग सबमिट केले व ते निवडले झाले. त्या नंतर ते विकले गेल. २५० एन्ट्रीज मधून फ्क्त ३० कलाकारांची निवड झाली होती आणि त्यात मी एक होते. तेंव्हा, मला ह्या कलेच्या क्षेत्रात आपल्याला नक्की काही करता येईल असे वाटू लागले. तेव्हा, माझा हा छंद व्यवसायाचं रूप घेऊ शकतो, अशी मला आशा वाटू लागली आणि मग मी थोडे धाडस केले. 

कले बरोबरचं नातं मजबूत बनवण्यासाठी मी काही अभ्यासक्रम पुर्ण केले. Folk art painting आणि Advanced Diploma in Interior design ह्या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण घेतले. ह्या कलेमुळे मला प्रसिद्धी आणि समाधान लाभले. अमेरिकन musician Frank Bango ह्यानी New York येथे माझं painting “Romance in the Rain”, ह्या त्याच्या म्युझिक अल्बम कव्हर साठी निवडल्याने मला बरीच प्रसिद्धी मिळाली. २०१५ मध्ये United Nations तर्फे Expo Milan, Italy येथे Exhibit करायचा मान मला मिळाला. पॅरीस, भारत, इटली, इंग्लंड ह्या देशात प्रदर्शन व विक्री करण्याचा योग आला. 

ही कला मला प्रेक्षकांबरोबर जोडते. माझं Painting जेव्हा कोणी भेट म्हणून आपल्या कुटुंबीयांना देतो तेव्हा त्या परिवाराच्या सुखात जोडली जाण्याची संधी मला लाभते. माझे रोमँटीक पेंटिंग्स हे बहुदा जोडीदाराकरता surprise म्हणून खरेदी केले जातात व त्या कलेचे जेंव्हा मला सकारात्मक अभिप्राय मिळतात, तेव्हा मला फार आनंद होतो. पेंटिंग्सच्या विक्रीतून काही रक्कम Cancer Research Foundation अशा charities ना दान करुन समाजाची सेवा करण्याची संधी मला ह्या कलेमुळे लाभली. प्रत्येक कलाकृतीत त्या Artist चा अंश असतो. 'Creativity takes courage' ही म्हण मला पटते. आपली कला लोकांसमोर मांडण्याचं धाडस प्रत्येक कलाकार करत असतो. माझ्या परिवाराची संपूर्ण साथ मिळाल्याने माझं कलेबरोबरचं नातं खूप मजबूत झालं. माझी ही 'कला' माझं नुसतं वेड राहिलं नसून माझं जीवन बनलं आहे. हे नातं असच चालू रहावं हीच प्रार्थना. धन्यवाद!

- मंजिरी कानविंदे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा