संपादकीय - ध्यास पूर्णब्रम्हाचा

यंदाचा आपला विषय सर्वांच्या जिवाभावाचा, वयाची मर्यादा नसलेला! ऋतुगंधच्या खाद्यसंस्कृती संकल्पनेला मान देऊन, तुम्ही एकापोक्षा एक व्यंजने सादर केलीत. आम्हाला अगदी टम्म करून सोडलंत, भरलेल्या मोदकासारखं. सारण इतकं फक्कडं जमलंय की ह्याचा आस्वाद घ्यायला सर्वांच्या पसंतीच्या एका दर्दी खवय्याला आम्ही बोलावलं आहे. तृप्त होऊन आमचा अनुभव पद्यात व्यक्त करत आहोत. गोड मानून घ्यावा...

चापूनी मस्त डोसे वडे
इटॅलियन कोर्सचे घेतले धडे
तुलनेत चायनीजचे ताट केवढे 
खावं की सोडावं... सारेच अवघड, गडे

सिंगापुरी फुड-कोर्ट म्हणजे खाद्याचा दरबार
मेक्सिकन, कोरियन खावं बारबार
पंगतची रंगत तर आहेच, सदाबहार,
नाहीतर घ्यावं पार्सल, थोडंफार

देशोदेशीच्या करोनी वाऱ्या
जिथल्या चवी तेथेची जाऊनी घ्याव्या
पोट आणि मन भरलं तर,
परत, पोळ्या भाजाव्या

आगळी ही मेजवानी आठवणींची
सुखाच्या तुपात एखादी पोळी दु:खाची
हळद, मीठ, मोहरीच्या कहाणी पलीकडली
खाद्यानुभावांची ही खिचडी ऋतुगंधी !


- सस्नेह
ऋतुगंध समिती २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा