गोष्ट तुझी आणि माझी !

"अँड दे लिव्हड हॅप्पिली एव्हर आफ्टर" हा बॉलीवूड सिनेमा मध्ये शेवट जरी असला तरी प्रत्येक्ष आयुष्यात मात्र ही सुरवात असते हे मला लग्न झाल्यावरच कळालेलं.आपण रोजच्या धावपळीत बिझी असतो आणि त्यातच काही दिवस, महिने आणि वर्ष कशी संपतात जातात ते काळतच नाही ना? मग एक दिवस लग्नाचा वाढदिवस येतो (आठवत असेल तर अर्थात ! पण आता सोशल नेटवर्किंग साईट्स मुळे फारच मदत होते लक्षात ठेवायला) अचानक लक्षात येतं की अरेच्या इतकी वर्ष कशी झाली आपल्या लग्नाला कळलच नाही. 

माझे बाबा आणि मी रोज सकाळी चहा घेत गप्पा मारायचो अगदी काहीहि गप्पा कॉलेज क्लास पासून ते नातेवाईक, नवीन सिनेमा आणि गाण्यांपर्यंत आमच्या गप्पा अगदी रंगायच्या. माझं लग्न चोवीसाव्या वर्षी झालं. लग्न ठरलं तेव्हा रोजचा चहा पीत गप्पा चालू असताना बाबांनी मला लग्न सुखी व्हावे ह्यासाठी तीन गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले, "हे बघ संचिता, सुरुवातीचे दिवस हे छान असतात. पण काही काळानंतर तुला लग्नाबद्दल असं कळेल की सगळंच काही हॅप्पी हॅप्पी आणि छान छान नसतं. तुझी जबाबदारी गौरव स्वीकारणार तशी तूही त्याची जबाबदारी स्वीकारायला हवी. एकमेकांना समजून घेत पुढचा प्रवास सुखाचा होतो. मी आज तुला तीन नियम सांगतो. एक म्हणजे एकमेकांवर खूप प्रेम करा कारण लग्नात तुम्ही जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल. दुसरा, पुढे जाऊन तुम्हाला मुलं होतील, त्यांच्यावर खूप प्रेम करा आणि तिसरे म्हणजे तुमच्या लग्नावर प्रेम करा. कारण पुढे जाऊन असे प्रसंग येतील जेव्हा तुमच्यात मतभेद होतील, अगदी एकमेकांचा राग येईल. तेव्हा तुमच्या लग्नावर प्रेम करायचं. जुने लग्नाचे फोटो पहायचे. एकमेकां बरोबर घालवले ते आनंदाचे क्षण आठवायचे. जुन्या आठवणींना नव्याने उजाळा द्यायचा. ह्या आठवणी तुम्हाला परत एकत्र आणतील." मी त्यावेळी हसून बाबांना म्हणाले, "अहो काहीही काय बाबा, इतकं काही नसतं." मग पुढे असे अनेक प्रसंग आले आणि पटलं बाबांनी तेव्हा हे सगळं का सांगितलं होतं. 

एकदा नेहमीसारखी एक संध्याकाळ होती. मी वेळेत घराजवळ पोहोचले आणि समोरच्या भाजीवाल्यांकडून भाजी घायला गेले. माझ्या समोर एक लांब केस असलेली पूर्ण पांढरा शुभ्र ड्रेस घातलेली मुलगी होती तेवढ्यात ती वळाली, बघते तर काय, ही तर निशा! निशा आणि मी कॉलेज मधल्या मैत्रिणी. अगदी रोज भेटायचो आम्ही पूर्वी . पुढे तिनी LLB केलं आणि मी MBA केलं. मग गाठी भेटी आपोआप कमी झाल्या आणि लग्न झाल्या नंतर तर ती मुंबईला गेली म्हणून तर काहीच कॉन्टॅक्ट नाही राहिला . मी हा सगळा विचार करत असतानाच निशा म्हणाली " हाय !अगं कित्ती वर्षांनी आपण भेटतोय !" निशा माझा हात हातात घेत म्हणाली. अगं गौरव कुठे आहे? आता कुठे असतेस ? मी म्हणाले अगं हो हो किती ते प्रश्न. आम्ही दोघी मा शेजारच्या हॉटेल मध्ये कॉफी घेत गप्पा मारायला बसलो. मग तेव्हा निशानि सांगितलं अनिल, तिचा नवरा, त्याची सहा महिने झाले पुण्यात बदली झाली म्हणून ते पुण्यात राहायला आलेत आता. तेव्हा निशा म्हणाली " संचिता मला सांग ना नक्की कसा आणि कुठे जमलं तुमचं ते? अनिल आणि मी गप्पा मारतांना तुझा विषय होतो . तुला तर माहितीच आहे आमच्या लग्नासाठी किती विरोध होता अनिल च्या घरून .पण मग पुढे अनिलच्या घरच्यांनी होकार दिलाच. सगळं व्यवस्थित झाला. अनिल चे आई बाबा ही चांगले आहेत पण आम्हाला सहा वर्ष थांबायाला लागला त्यांच्या होकारासाठी. पूर्वी आमच्या खूप गप्पा व्हायच्या नवरा कसा असावा अश्या . निशा आणि अनिलचा तर कॉलेज मध्ये असतानाच जमलं होता. तशी निशा म्हणाली आग सांग ना तुमची स्टोरी. मी म्हणाले "अगं स्टोरी अशी काही नाही ग .. आता आमची ओळख होऊन १२ वर्षी झाली. आमची ओळख MBA करायच्या निमित्ताने झाली. पुढे माझा MBA चं कॉलेज आणि गौरव चे ऑफिस एकाच एरिया मध्ये होते . मग काय कधी ठरवून आणि कधी न ठरवता भेटणं सुरु झालं . मला गौरवशी ओळख वाढली तेव्हाच काळाले होते, हाच तो असं मा एक दिवस आम्ही गप्पा मारताना मीच त्याला प्रोपोज केलं . गौरव नि मात्र पूर्ण वेळ घेऊन , खप विचार करून चार वर्षांनी होकार दिला. मी माझ्या घरी आणि त्यानी त्याच्या घरी सांगितलं . मा काय जुलै २००८ ला साखरपुडा आणि पुढच्या सहा महिन्यात लग्न सुद्धा झाले. इतकं फास्ट झालं बघ सगळं". निशा हसत म्हणाली, "म्हणजे अगदी झट मंगनी आणि पट बिह्या झाला ग तुमचा तर. म्हणजे लव्ह कम arrange झाला तर."

बोलत असताना जाणवला कि पूर्वी अगदी टवटवीत आणि उत्साही असणारी निशा आता तशी नव्हती दिसत..डोळ्याखाली काळं आलं होतं , केस तोडे पांढरे दिसत होते ,अशी दमलेली -थकलेली वाटत होती. मी तिला विचारणार च इतक्यात निशा गंभीर होऊन म्हणाली "संचिता तुमचं अगदी अधिसारखं च प्रेम आहे का गं एकमेकांवर का आता अवनीश झाल्या पासून बदलय ? अगं अनिल आणि माझा तरी प्रेम विवाह होता अँड ववेर सो मुच इन लव्ह. पूण आता सात्विक झल्यापासून मला असं वाटतं आमच्यात काही प्रेमच उरला नाहीये. आधी आमच्या आवडी निवडी इतक्या सारख्या होत्या कधीही भांडण नाही व्हायचे . त्यात अता नवीन घराचे लोन आणि अनिल चं खूप ऑफिस चं काम, ह्यांनी अजून च भांडणं वाढतात. मला आश्चर्य वाटलं. पूर्वी एक आदर्श जोडी म्हणून कॉलेज मध्ये निशा आणि अनिल प्रसिद्ध होते आणि आता असे कसे झाले. ती म्हणाली अगं म्हणजे चर्चे चं रूपांतर कायम भांडणात होतं आजकाल आणि सात्विक च्या कामांवरून भांडण होतात. 

निशा ला मी समजावलं " निशा बाळ झालं कि रेलशनशिप मध्ये फरक पडणारच. आमच्या सुद्धा लग्नावर त्याचा परिणाम झाला पण आता अवनीश मुळे अजूनच घट्ट झाली लग्नाची गाठ.होता कसा एक व्यक्ती नवीन आलीये म्हणून आपण आई होतो आणि आपल्यातलतली आधीची प्रेयसी कुठेतरी हरवते . ती एक लग्नातली phase च असते. आणि पूर्वी सारखे दिवस कसे राहतील... आता आपल्यावर जवाबदारी आहे .आपण आता मुलगी , प्रेयसी आणि आई असे तीन रोल्स सांभाळत आहोत. मी तुला सांगू का प्रत्येक जणच ह्यातून जातो. इट इज अ natural सायकल ऑफ marriage. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात ग उदा: रोज दहा मिन का होईना गप्पा मारणे, रात्री मुलं झोपली कि शांतपणे आइस क्रीम खाणे , कधी एक फेर फटका मारून येणे तर कधी सिनेमा पाहणे ह्या सगळ्या गोष्टींमुळे बॉण्डिंग वाढते. आणि सात्वीक ची कामं वाटून घ्याची. म्हणजे आमच्यासाठी तरी सगळं हे उपयोगी पडलय. निशा ला हि गोष्ट पटल्यासारखी वाटली. निशा आपणहून च म्हणाली, "मी TRY करून बघते". 

काही महिन्यांनी निशा अचानक मुलांच्या शाळेत दिसली. छान लांब केस बांधले होते, काळ्या रंगाचा शर्ट होता आणि जीन्स होती आणि चेहऱ्यावर एक स्मित हास्य होते .फ्रेश दिसत होती. मुलं ग्राउंड वर खेळायला गेली आणि निशा गप्पा मारायला आली. मी तिला म्हणाले "निशा खुप छान दिसत्येस ग अगदी कॉलेज मध्ये दिसायचीस ना तशी. इज इट लव्ह ऑर डव्ह? ह्यावर आम्ही दोघी हसलो आणि ती म्हणाली कि अगं तुझ्याशी त्या दिवशी गप्पा मारल्या मा घरी जाऊन अनिलला सांगितलं. आम्ही एकमेकांशी जास्त संवाद साधला. पुन्हा नव्यानं सुरवात केली आणि आता आमचा अगदी पूर्वी सारखं प्रेम आहे. अगं कुटुंब म्हणजे तरी काय तर आपला एक सुंदर विश्व ह्या मोठ्या जगात. नवरा बायको नि एकमेकांचे गुण-दोषांसकट एकमेकांना स्वीकरायला हवं. एक व्यक्ती म्हणून तुम्ही कसे विकसित व्हाल एकमेकांच्या साहाय्यने ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आयुष्य फार मोठं आहे त्यासाठी एका मित्राची सोबत, नवऱ्याचा भक्कम आधार आणि ना संपणारे प्रेम, ह्यांनी अजूनच सुंदर होतं आयुष्य हे खरंय. मा मी निशाला गौरव नि घेतलेला लग्नाच्या वेळेचा उखाणा सांगितला "एकमेकांच्या सहाय्याने, संसार होईल सुखकर, संचिता करेल पोळ्या आणि मी लावीन कुकर!".


- संचिता साताळकर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा