असे देखिले सिंगापूर

आठविल्या ओळी बघता सिंगापूर|
“जीवन मे एक बार आना सिंगापूर”||
जे खचित भासे सौंदर्यापूर |
बघून आनंद मिळे भरपूर ||
असे सुंदर सिंगापूर||१||

इथे सुस्थळांचे बहुत पसारे|
बघुनि मनमोरांचे फुलती पिसारे ||
वाटे पर्यावरण बहु हासरे|
असे आल्हादक हवा भरपूर||
असे रम्य ते सिंगापूर ||२||

वसुंधरेची इथे विविधता|
बघता नयनी वाटे प्रसन्नता||
तरुवेलींची इथे विपुलता|
जलचरांच्या प्रजाती बघा भरपूर||
असे हिरवे हिरवे ते सिंगापूर||३||

नीटनेटके पेहेराव ललनांचे|
वाटे अवतरले तारकागण नभीचे||
कुठुनी येती कुठे लोपती?|
भासे एक सारखा नूर||
असे लोभस ते सिंगापूर||४||

इथे रुजली मॉल संस्कृती |
अबब वस्तूंचे प्रकार ते किती ||
खाद्य पेय पदार्थ ते किती |
अवश्य करावी खरेदी भरपूर ||
असे समृद्ध सिंगापूर ||५||

MRT ची गम्मत न्यारी |
वर्णावी तिची सेवा खरी ||
सेवेत तिच्या सदैव खबरदारी |
जरी तिला नाही इंजिन नाही धूर |
असे टापटीप सिंगापूर ||६||

जल, विद्युल्लतेची असे अखंडता |
आणि नांदते सदैव शांतता ||
भावली इथली स्वच्छ ऋजुता |
पर्यटकांचा इथे सदैव पूर ||
असे प्रेक्षणीय सिंगापूर ||७||

नियमांसाठी असे जागृती |
वाहनचालक नियम पाळिती ||
स्वास्थ्यासाठी सतर्कता अति |
समाज जीवन असे सुमधुर ||
असे आदर्श सिंगापूर ||८||

सौ. शैलजा सोनगावकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा