महाराष्ट्र मंडळ सिंगापूर कार्यकारिणी २०१७-१८
















ऋतुगंध संयोजक - यशवंत काकड
स्वरगंध संयोजक - नलिनी थिटे
शब्दगंध संयोजक - अरुण मनोहर
लायब्ररी संयोजक - सदानंद राजवाडे
मराठी शाळा संयोजक - नलिनी थिटे , प्राजक्ती मार्कण्डेय




अस्मिता तडवळकर - अध्यक्ष
  • २००८ मध्ये NTU मधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले व तेंव्हापासून स्वतःचा व्यवसाय सांभाळते आहे 
  • महाराष्ट्र मंडळात २०१२ पासून वाचनालय स्वयंसेवक म्हणून कार्यरत 
  • गेली २ वर्षे कार्यकारिणीमध्ये सहभाग 
    • २०१४ - सचिव 
    • २०१५ - उपाध्यक्ष 
    • २०१६ - अध्यक्ष 
    • २०१७ - अध्यक्ष

नलिनी थिटे - उपाध्यक्ष
  • नलिनी विद्युत अभियांत्रिकी पदवीधर असून तिने कॅपजेमिनी व इन्फोसिस सारख्या कंपन्यांमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम केले आहे. ती सध्या स्वतःची प्रोव्हिएन्ट नावाची कंपनी चालवते जिच्यातर्फे ती छोट्या कंपन्या व संस्थांना माहिती तंत्रज्ञान व डिजिटल मार्केटिंग बद्दल लागणारी मदत करते. 
  • नलिनी २००६ पासून महाराष्ट्र मंडळाची सभासद असून गेली २ वर्षे कार्यकारिणी मध्ये कार्यरत आहे. तिने जनसंपर्क अधिकारी व कोषाध्यक्ष ही पदे सांभाळली आहेत. तिने या आधी इंडियन वूमेन्स असोसिएशन मध्ये ३ वर्षे मीडिया मॅनेजर म्हणून काम बघितले होते.
  • तिच्या तंत्रज्ञान व संघटना कौशल्याचा वापर करत महाराष्ट्र मंडळांच्या सभासदांचा मंडळाबरोबरचा प्रत्येक अनुभव हा सरळ सोपा व सुखद व्हावा यासाठी या वर्षी सलग प्रयत्न करण्याचा तिचा मानस आहे.

स्मिता अंबिके – कोषाध्यक्ष 
  • गेली २२ वर्षे सिंगापूरमध्ये वास्तव्य आणि महाराष्ट्र मंडळ सिंगापूरशी संपर्क आणि सहवास. 
  • शिक्षणाने B.Com. आणि इंग्लंड्च्या CIMA या संस्थेतून मॅनेजमेंट अकाउंटंट व Oxford sponsored Diploma in Psychology. परदेशी वास्तव्यात तिथल्या महाराष्ट्र मंडळांशी परिचय.
  • गेली दोन वर्षे मंडळाच्या कार्यकारिणीत पदाधिकारी म्हणून सहभाग. २०१५ साली कोषाध्यक्ष आणि २०१६ मधे उपाध्यक्ष/स्वरगंध संयोजक म्हणून पदभार सांभाळला.
  • त्याआधी मंडळात अनेक वर्षे स्वयंसेवक म्हणून विविध प्रकारचे कार्य. मंडळाच्या उद्दिष्टांविषयी अतोनात आदर आणि मंडळासाठी काम करण्याची अत्यंत आवड. 


श्यामल भाटे- कार्यवाह 
  • १० वर्षापासून सिंगापूरमध्ये वास्तव्य. शिक्षण- इलेक्ट्रोनिक्स इंजिनिअर. 
  • भारतात काही वर्षे टेलीकम्युनिकेशन ह्या क्षेत्रात काम केले आणि आता सिंगापूर मध्ये पूर्णवेळ गृहिणी हे पद सांभाळते.
  • दोन वर्षे मंडळाच्या कमिटीमध्ये काम केले आहे आणि तसेच गेल्या ५ वर्षापासून लायब्ररीमध्ये देखील स्वयंसेवक म्हणून काम केले आहे.
  • मंडळाच्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हायला नेहमीच आवडते. 

भूषण गोरे  - उपकोषाध्यक्ष 
  • गेली १० वर्षं सिंगापुरमध्ये वास्तव्य 
  • प्रोफेशन-इंजिनिरिंग 
  • गेली १० वर्षं म.म.सिं.सभासद
  • म.म.सिं. सभासदांची संख्या वाढवण्याची इच्छा आहे 

अरूण मनोहर - उपकार्यवाह 
  • बी. ई. (इलेक्ट्रोनिक्स)
  • स्वयंचलीत प्रणालींवर काम केले आहे. सध्या स्वत:साठी कार्यरत. 
  • म.म.सिं. संघटनेत विविध कामे केली आहेत व करण्याचा मानस आहे.  

प्राजक्ती मार्कंडेय - जनसंपर्क अधिकारी 
  • गेली सात वर्षे सिंगापुरमध्ये वास्तव्य आहे. संगणक विषयात उच्च पदव्युत्तर आहे. 
  • शास्त्रीय संगीत विषयाच्या सहा परीक्षा उत्तीर्ण आहे, तसेच महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतही चार उत्कृष्ट अभिनयाची प्रमाणपत्रे संपादन केली आहेत. 
  • महाराष्ट्र मंडळाची २०१५ पासून सक्रिय सभासद आहे. २०१५ साली महाराष्ट्र मंडळाच्या वार्षिक नाटकात तेसेच २०१६ विविध गुणदर्शन या कार्यक्रमाचे संचलन केले. मंडळाच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी व्हायला आवडते. 

यशवंत काकड
  • नॅशनल युनिवरसिटी ऑफ सिंगापुरमधून संगणक विषयात पदव्युत्तर.
  • 'ईंटरनेट ऑफ थिंग्स' ह्या क्षेत्रात संगणक अभियंता म्हणून कार्यरत.
  • १७ वर्षांपासून मंडळाचा सभासद. ह्यापुर्वी अनेकदा कार्यकारिणीमधे काम केले आहे आणि नेहमीच स्वयंसेवक म्हणून काम करायला तत्पर. 
  • मंडळाचे जे कार्यक्रम होतात त्याची एक संहिता असावी असे वाटते जेणेकरुन नवीन कार्यकारिणीला कुठलाही कार्यक्रम करताना मार्गदशन म्हणून त्या संहितेची मदत होईल आणि मंडळाच्या कार्यक्रमांना आणखी एक चांगले रुप प्राप्त होईल. 

अमृता कुलकर्णी 
  • गेली ५ वर्षे सिंगापूरमध्ये वास्तव्य आणि मंडळाची सभासद.पुणे विद्यापीठामधून MCM ची पदवी घेतली आहे. आता पूर्ण वेळ गृहिणी. 
  • मागील वर्षी मंडळाच्या अनेक कार्यक्रमात स्वयंसेवक म्हणून सहभागी तसेच लायब्ररीमध्ये देखील स्वयंसेवक म्हणून काम केले आहे. मंडळाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमात वेळोवेळी उत्साहाने सहभागी होण्यात तसेच काम करण्यास सदैव तत्पर.

कौस्तुभ राव 
  • २०१३ मध्ये एस पी जैन मधून IT मध्ये पदव्युत्तर झालो व तेव्हापासून सिवा लॉजिस्टिकस सिंगापूरमध्ये मॅनेजर म्हणून काम करतो.  
  • २०१४ मध्ये म. म. सिं चा सभासद झालो आणि वाचनालय स्वयंसेवक म्हणून काम केले 
  • २०१५ पासून मंडळाच्या कार्यकारिणीचा सदस्य आहे २०१५ व २०१६ मध्ये वाचनालय संयोजक म्हणून काम केले.  
  • २०१७ च्या कार्यकारिणीत माझ्या पूर्व-अनुभवाचा मंडळाच्या उपक्रमांना अधिकाधिक लाभ मिळेल या साठी प्रयत्नशील.  

समीर कोझरेकर
  • वाणिज्य अधिस्नातक , मुंबई विद्यापीठ . 
  • ​​लेखापाल  (company name : MSD Singapore मध्ये २००८ पासून कार्यरत)
  • २०१० मध्ये वाचनालय आणि इतर कार्यक्रमात स्वयंसेवक , २०११ पासून कार्यकारिणी मध्ये कोषाध्यक्ष / वाचनालय संयोजक / सभासद अश्या विविध पदांवर कार्यरत आहे. 

सचिन वर्तक 
  • गेली ७ वर्षे सिंगापूरमध्ये वास्तव्य, सध्या ओरॅकल मध्ये कार्यरत
  • सिंगापुरात आलेल्या तिसऱ्या दिवसापासून म.म.सिं. सभासद
  • मी २०१२ पासून म.म.सिं. कार्यकारिणीचा भाग असून गणेशोत्सव, नाटक यासारख्या वेगवेगळ्या उपक्रमात सहभाग घेत असतो. माझी पत्नी व दोन्ही मुली गात असल्याने, आम्ही एक "म्युझिकल फॅमिली" आहोत.
  • मला मराठी संस्कृतीचा अभिमान आहे आणि म्हणूनच म.म.सिं.सारख्या उत्साही आणि मोठ्या संस्थेत काम करताना मला अत्यंत आनंद व समाधान मिळते.
सदानंद राजवाडे
  • गेली ८ वर्षे सिंगापूरमध्ये वास्तव्य व शिपिंग कंपनीच्या अकाउंट्स मध्ये कार्यरत 
  • २०१२ पासून MMS सभासद व विविध कार्यक्रमांमध्ये स्वयंसेवक म्हणून काम केले आहे 
  • गेल्या ४ वर्षांपासून कार्यकारिणीमध्ये सहभाग

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा