आरोग्यम् धनसंपदा - दोषानुरुप आहारविचार भाग २

दोषानुरुप आहारविचाराच्या पहिल्या भागात आपण वातदोषानुरुप आहाराचा विचार केला. आता ह्या दुसऱ्या भागात आपण पित्त व कफ दोषानुरुप आहाराचा विचार करुया. आपणा सर्वांनी आपली प्रकृती कुठली हे जाणून घेतलं असेलच. ज्यांना अजूनही जाणून घ्यायची उत्सुकता आहे त्यांनी www.chopra.com या वेबसाईट वर जाऊन explore our resources मधील dosha quiz घ्यावी. 


पित्तदोषानुरुप पथ्यापथ्य विचार!
कोणी ह्या आहाराचे पालन करणे:
  • पित्तप्रकृती प्रधान स्वस्थ व्यक्तिंनी 
  • शरद ऋतूत (ऑगस्ट ते ऑक्टोबर)
  • तारुण्यावस्थेत 
  • पित्तज रोग - migraine, headache, vertigo, acidity, आम्लपित्त, त्वचारोग, high BP.  
  • पित्तवृद्धी लक्षणे - शरीरातील उष्णता वाढणे, डोळ्यांची व हातापायांची आग होणे, डोकेदुखी, चक्कर, अपचन, घशाशी जळजळणे, तोंड येणे, अधिक तहानलागणे व घाम येणे, त्वचेवर पुरळ येणे किंवा गांधी येणे, केस अकाली गळणे व पिकणे. 

Dont's (अपथ्य):
  • अती आंबट, खारट तसेच तिखट, उष्ण, तीक्ष्ण, असे पुढील पदार्थ:
  • आंबट दही, आंबट ताक 
  • चिंच, कच्ची कैरी, लिंबू, अननस, या सारखी आंबट फळे
  • हिरवी मिरची, लसूण, लोणची, खारवलेल्या मिरच्या, असे तिखट पदार्थ 
  • वडा, सामोसा, भजी या सारखे तळलेले पदार्थ 
  • शेंगदाणे, काजू, तीळ या सारखे उष्ण पदार्थ
  • तूर डाळ, कुळीथ, बाजरीची भाकरी, मेथी (पाले भाजी)
  • इडली, डोसा, ब्रेड, ढोकळा- आंबवलेले पदार्थ 
  • चहा, कॉफी, अल्कोहोल युक्त पेये 
  • शिकरण, मिल्क शेक, गरम पाणी व मध असा विरुद्ध आहार 
  • शारिरीक श्रम, सतत प्रवास, उन्हात फिरणे 
  • उपवास, जागरण, दुपारी जेवणानंतर लगेच झोपणे 
  • सतत राग आणि चिंता 
Do's (पथ्य):
  • गोड, तुरट, कडू रस आहारात घ्यावेत 
  • तूप साखर पोळी, लोणी साखर पोळी, दूध भात, भाताच्या लाह्या, कणकेची किंवा शिंगाड्याच्या पिठाची खीर घ्यावी 
  • ज्वारी किंवा तांदळाची भाकरी 
  • मूग, मसूर, मटकी, हरभरे यांचे वरण किंवा आमटी 
  • खोबरं, कोथिंबीर, धणे-जिरे पूड, आले, आमसूल याचा वापर करावा 
  • आवळ्याचे सरबत, शहाळ्याचे पाणी, कोकम सरबत, मनुकांचे सूप, डाळिंबाचा रस 
  • पालेभाज्या: लाल माठ, पालक आणि चवळी 
  • फळभाज्या: पडवळ, रताळं, दोडके, बटाटा, दुधी, भोपळा, बीट, काकडी 
  • फळे: चिकू, डाळिंब, पैर, सफरचंद, केळी, गोड द्राक्ष, खजूर, मनुका 
  • जेवणाच्या नियमित वेळा, भुकेच्या वेळी योग्य प्रमाणात अन्नाचे सेवन (पोट रिकामे ठेऊ नये)

कफदोषानुरुप पथ्यापथ्य विचार!
कोणी ह्या आहाराचे पालन करावे:
  • कफप्रकृती प्रधान स्वस्थ व्यक्तिंनी 
  • वसंत ऋतूत (फेब्रुवारी ते एप्रिल)
  • १२ वर्षा खालील मुलांनी 
  • कफज् रोग- वारंवार सर्दी, खोकला, दमा, त्वचा रोग, sinusitis, rhinitis, U.R.T.I.,obesity, cholesterol, diabetes 
  • कफवृद्धी लक्षण-सर्दी, खोकला, दमा, अग्निमांद्य (भूक न लागणे), वजन वाढणे, शरीरावर सूज, त्वचेला खाज, अती झोप, थोडेसे काम केले तरी थकायला होणे 
Dont's (अपथ्य):
  • फ्रिज चे थंड पाणी व शीत पेय 
  • दही, केळी, द्राक्ष, पेरू, चिकू, असे कफकारक पदार्थ 
  • अती गोड, आंबट, खारट, असे खालील पदार्थ 
  • गोडाचा शिरा, लाडू, पेढे, चॉकोलेटे pastries, cake असे स्निग्ध व पचायला जड पदार्थ 
  • भात, बटाटे, pasta, pizza, bread, असे पिष्टमय पदार्थ 
  • लोणचं, टोमॅटो ketchup, चिंचेचे सार असे आंबट, खारट पदार्थ 
  • वडा, सामोसा, भजी या सारखे तळलेले पदार्थ
  • अती झोप, दुपारी जेवणानंतर लगेच झोपणे
  • मद्यपान 
Do's (पथ्य):
  • सकाळी उठल्यावर गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात 
  • आहारात तिखट, तुरट, कडू रस घ्यावेत
  • सर्व धान्ये निदान १ वर्ष जुनी व भाजून वापरावीत. अशी धान्ये पचायला हलकी असतात 
  • ज्वारी, बाजरी किंवा नाचणीची भाकरी 
  • खाकरा, धिरडी, घावन, भाजणीचे थालिपीठ 
  • दोन्ही जेवणापूर्वी कोमट पाणी, भाज्यांचे सूप किंवा मुगाच्या वरणाचे गरम पाणी 
  • भाजी आमटीत आलं, लसूण, सुंठ, मिरी, लवंग, तमालपत्र, हळद, धणे, दालचिनी अशा उष्ण मसाल्यांचा वापर करावा 
  • फळे: डाळिंब, सफरचंद,जांभूळ, पपई 
  • भाज्या: पडवळ, दुधी, शेवगा, मुळा, गाजर 
  • नियमीत व्यायाम करावा 
  • महिन्यातून किमान दोनदा तरी लंघन करावे 

अशा प्रकारे आपण आयुर्वेदानुसार दोषानुरूप आहार आणि आरोग्य यांच्या परस्पर संबंधांचा विचार केला

दोषप्रकोप झाला की रोग निर्माण होतात. त्या वेळी वरील पथ्यापथ्याचे कटाक्षाने पालन करावे. तसेच आहाराचे सुयोग्य भान कायम ठेवले तर आपले आरोग्य आपल्याच हातात (आहारात) राहील !

पुढील लेखात विरुद्ध आहार व काही समज गैरसमज... 


- डॉ. रुपाली गोंधळेकर 

1 टिप्पणी: