परमार्थ

अवघ्या आसमंतात 
भरूनही उरलेला तू, 

समोर असूनही नजरेआड, 
पारदर्शक पडद्यामागून
चालतात तुझी सर्व सूत्र, 
कधी होतोस मातापिता
कधी सखामित्र, 

विश्वाचा पसारा
मांडतोस... मोडतोस
कणाकणात भरून राहतोस
पण दाखवतोस तुझं अस्तित्व
... फक्त जाणिवेमधून!!!

- युगंधरा परब

1 टिप्पणी: