चित्रकथा


ऋतुगंध वर्षाची केंद्रकल्पना वाचून आणि उद्या ९ ऑगस्ट रोजी सिंगापूरचा ५२ वा स्वतंत्रता दिवस साजरा होईल, त्या निमित्ताने सिंगापूरच्या ५०व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या आठवणी जाग्या झाल्या. त्यानिमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होत. गेल्या ५० वर्षात सिंगापूरने केलेली प्रगती ही सिंगापूरमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट होती.

आपल्या रूढी परंपरा झुगारून देणे म्हणजे स्वातंत्र्य अशीही काही लोकांची व्यक्तिगत स्वातंत्र्याची कल्पना असते. पण परदेशात आल्यावर मात्र ह्याच रूढी परंपरा जपण्यासाठी प्रयत्न केले जातात. सिंगापुरातील Demure Drapes ही अशीच एक आपला भारतीय पोशाखम्हणून प्रसिद्ध असलेली साडीची परंपरा जपणारी आणि त्याला प्रसिद्धी मिळवून देणारी संस्था.

तर ह्या demure drapes च्या रुबीनेही ५०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त साडी नेसून( Walk for the nation) एक पदयात्रा आयोजित करण्याचा बेत आखला.आता साडी सर्वांची सारखी असेल आणि सिंगापूरच्या ध्वजाच्या रंगाची असेल तर? मग अनेक कलागुण अंगी असलेल्या सुबीना अरोरा खनेजाने ह्या साडीचे डिझाईन बनवले. 

रंग सिंगापूरच्या ध्वजाशी मिळताजुळता पांढरा आणि लाल असा दुरंगी होताच पण त्यावर सिंगापूर गार्डन्स बाय द बे च्या सुपर ट्रीचे चित्रही होते.

ठरल्याप्रमाणे दोनशेहूनही जास्त स्त्रिया ६ वाजता पॅशन वेव्ह पाशी जमल्या आणि पदयात्रा सुरु झाली. साडी नेसून किती चालता येईल? असे म्हणता म्हणता ३ किलोमीटर अगदी सहज हसत खेळत चालून झाले. अनेक फोटो काढले, नव्या ओळखी झाल्या,एक नवाच अनुभव होता.

सर्वजणी मग एकत्र होऊन बस मधून कम्युनिटी सेंटर मध्ये गेलो. तिथे झेंडावंदनाचा कार्यक्रम झाला. प्रसिद्धी माध्यमांनीही ह्या उपक्रमाला उचलून धरले. सिंगापुरात वास्तव्य असणाऱ्या मूळ भारतीय वंशाच्या प्रत्येकासाठी खूप आनंददायी असा हा उपक्रम होता.
- राजश्री लेले


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा