महाराष्ट्र मंडळ सिंगापूर - वार्ता

क्रीडास्पर्धा

ममंसिंचा आणखी एक लोकप्रिय उपक्रम म्हणजे वार्षिक क्रीडास्पर्धा. यावर्षी बोलिंग व बॅडमिंटन स्पर्धा अनुक्रमे २४ व ३१ जानेवारी रोजी पार पडल्या. दोन्ही मिळून साधारण ७० स्पर्धकांनी यात भाग घेतला.

यावर्षीची उल्लेखनीय गोष्ट म्हणजे बक्षीस समारंभ त्याच ठिकाणी चषक वितरित करून करण्यात आला. मध्यवर्ती अशा कालांग लीजर पार्क व सिंगापूर स्पोर्ट्स हब या ठिकाणी या स्पर्धा आयोजित केल्या गेल्या.

क्रीडा स्पर्धेचे निकाल
  • बोलिंग - पुरुष
    •  विजेते – राहुल खासनीस 
    • उपविजेते – महेंद्र रायदुर्ग 
  • बोलिंग - स्त्री 
    • विजेत्या – ईशा मुंगरे 
    • उपविजेत्या – भाग्यश्री गुप्ते 
  • बोलिंग - सांघिक 
    • विजेते – अजित आणि ईशा मुंगरे, राहुल खासनीस, महेंद्र रायदुर्ग
    • उपविजेते – धनेश गुप्ते, सदानंद राजवाडे, शिरीष कुलकर्णी, जीत खासनीस 
  • बॅडमिंटन - पुरुष एकेरी 
    • विजेते – सागर 
    • उपविजेते – लोकेश कुलकांती 
  • बॅडमिंटन - स्त्री एकेरी
    • विजेत्या – विनीता मंत्री 
    • उपविजेत्या – सायली जोशी 
  • बॅडमिंटन  - पुरुष दुहेरी 
    • विजेते – अविनाश लोटके आणि सागर कारवा 
    • उपविजेते – विनय जोशी आणि योगेश हरकारे  
  • बॅडमिंटन - स्त्री दुहेरी
    • विजेत्या – विनीता मंत्री आणि रीला पात्रो 
    • उपविजेत्या – तनया किंजवडेकर आणि मृणाल देवस्थळे 
  • बॅडमिंटन - मिश्र दुहेरी
    • विजेते – विनीता मंत्री आणि अविनाश लोटके 
    • उपविजेते – सायली जोशी आणि लोकेश कुलकांती 


हळदीकुंकू

सालाबादप्रमाणे हळदीकुंकू कार्यक्रम ६ फेब्रुवारी २०१६ रोजी आयोजित करण्यात आला.

यावेळेस 'घरगुती वस्तू वापरून विज्ञान' यावर मुलांसाठी व पालकांसाठी कार्यक्रम घेतला गेला. मुलांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण होण्यासाठी किती सोप्या पद्धतीने आपण काही प्रयोग मुलांना करू देऊ शकतो याचे प्रात्यक्षिक मराठी विज्ञान परिषदेचे श्री अ. प. देशपांडे यांनी दाखविले. दीड तासाच्या या कार्यक्रमात त्यांनी मुलांकडून साधारण सहा सोपे प्रयोग करून घेतले.

त्यानंतर घरातला ओला कचरा वापरून कंपोस्ट तयार करण्याची कृती, कचरा रिसायकल करून कंपोस्ट तयार करण्याचे महत्त्व व भारतात आणि सिंगापूर मध्येही या विषयावरील जागरुकता अभियानाची माहिती सौ. वैशाली वैद्य आणि सौ. चित्रा मनोहर यांनी दिली.

साधारण ७० छोट्या व मोठ्या सभासदांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.

घरच्या घरी कंपोस्ट या विषयावर आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास किंवा आपण घरी कंपोस्ट तयार करत असाल तर आम्हाला माहिती व छायाचित्रे पाठवा feedback@mmsingapore.org वर.


वार्षिक सर्वसाधारण सभा

२७ फेब्रुवारी २०१६ रोजी मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेमध्ये मावळत्या कार्यकारिणीच्या वर्षभरातील कार्यक्रमांचा धावता आढावा घेण्यात येतो, सभासदांकडून आलेल्या प्रस्तावांवर चर्चा होते, तसेच नवीन कार्यकारिणी स्थापन होते.

ह्या सभेमधे २०१५ च्या अध्यक्ष मंजिरी कदम व कार्यकारिणी सदस्यांनी वर्षभर झालेल्या मंडळाच्या कार्यक्रमांचा अहवाल दिला व खजिनदारांनी वर्षभर झालेल्या जमाखर्चाचा आढावा घेतला. २०१५ चे लेखापरिक्षक (ऑडिटर) श्री. अमृत जोशी आणि श्री. अमोल करमळकर यांनी तपासलेला मंडळाचा वर्षभराचा आर्थिक अहवाल श्री. अमृत जोशी यांनी सर्वसाधारण सभेत सादर केला. त्यावर चर्चा होऊन एकमताने त्याला मंजुरी मिळाली.

यानंतर सर्वात महत्वाचा कार्यक्रम म्हणजे नव्या कार्यकारिणीची निवड. ह्यात २०१५ कार्यकारिणीतील १० सभासदांचा समावेश असून ३ नवीन सभासदांची बिनविरोध निवड झाली. नवनिर्वाचित अध्यक्ष व कार्यकारिणी खालीलप्रमाणे:
  • अध्यक्ष - सौ अस्मिता तडवळकर
  • उपाध्यक्ष, स्वरगंध संयोजक - सौ स्मिता अंबिके
  • कार्यवाह - श्री विशाल पेंढारकर
  • खजिनदार - नलिनी थिटे
  • उपकार्यवाह, ऋतुगंध संयोजक - जुई चितळे
  • उपखजिनदार - श्री सदानंद राजवाडे
  • जनसंपर्क अधिकारी - अदिती पाटणकर - गुप्ता
  • सभासद, शब्दगंध संयोजक  - श्री अरुण मनोहर
  • सभासद - श्री समीर कोझरेकर
  • सभासद, वाचनालय संयोजक - श्री कौस्तुभ राव
  • सभासद - श्री पुष्कर प्रधान
  • सभासद - वेदश्री जठार
  • सभासद - श्री भूषण गोरे 

ऑडिटर्स 
  • श्री सुरजित मेहेंदळे
  • श्री कुलदीप जोशी



आगामी कार्यक्रम

एप्रिल - गुढी पाडवा, स्वरगंध निवड चाचणी

मे - आजीव सभासद सभा

- मंजिरी कदम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा