परिवार वार्ता

IB diploma (12th) मध्ये विद्यार्थ्यांचे उत्तुंग यश


सिंगापूरस्थित काही मराठी विद्यार्थ्यांनी IB डिप्लोमा या १२वी समतुल्य परीक्षेमध्ये या वर्षी घवघवीत यश मिळवले आहे. त्यांचे हार्दिक अभिनंदन.


रसिका काळे

रसिकाने या परीक्षेत ४५/४५ गुण मिळवले असून ती आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिली आहे. GIIS - ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी असलेली रसिका ही अष्टपैलू विद्यार्थिनी अभ्यासाबरोबरच नृत्यामध्येही निपुण आहे.

सुकृत गोंधळेकर



UWCSEA (United World College South East Asia) East campus या शाळेचा विद्यार्थी सुकृत यानेही या परीक्षेमध्ये ४५/४५ असा परफेक्ट स्कोअर मिळवला आहे. शाळा व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक मिळवणारा सुकृत नुकताच नॅशनल सर्व्हिसमध्ये रुजू झाला असून पुढे इंजिनीरिंग करू इच्छितो.

मुग्धा पटवर्धन 

मुग्धाने या परीक्षेमध्ये ४४/४५ गुण मिळवले असून तिला तिच्या शाळेचे UWCSEA (United World College South East Asia) बायोलॉजी आणि केमिस्ट्रीचे अवॉर्डही मिळाले आहे. 


अनुजा शुक्ला


अनुजा शुक्ला ह्या GIIS - ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनीने सुद्धा ४३/४५ गुण मिळवून या परीक्षेत भरघोस यश मिळविले आहे.


या सर्वांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !!


२ टिप्पण्या:

  1. रसिका, सुकृत, अनुजा, मुग्धा तुम्ही कमाल केलीत.खूप खूप अभिनंदन!

    आमच्या वेळेस 45 ला passing असायचे तेव्हा मला मिळालेले मार्क घेतले तर मीही दहावा अकरावा आलो असतो जगात. छान वाटले असा विचार करुन.

    उत्तर द्याहटवा
  2. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा