नाती-गोती

नातं आणि गोतं 
करायचं नसतं कधी रितं
ओंजळ भरून घेत राहायची 
प्रत्येक वळणावर नाती जोडत जायची !

रक्ताचे असो वा जोडलेले
लांबचे असो वा जवळचे
नात्यांची आपलीच व्याख्या असते
जुळली मने तर काहीच परिभाषा नसते !

नातं हे एकटं नसतं 
दोन व्यक्तींचं जुळलेलं मन असतं 
नात्यात असावी सुख-दु:खाची जाणिव 
मग उरणार नाही काहीच उणीव !

थोपलेली नाती कधीच टिकत नाहीत 
जन्म सरतो पण मनं जुळत नाहीत 
समज़ुन घेतलं तर ते नातं 
नाहीतर सगळं रितं रितं !

काहि नाती दुरूनच सुंदर असतात
प्रत्यक्षात जवळ येताच विद्रुप होतात
नाती जपणं हे महत्वाचं काम
जन्मभर करत रहावं तरी लाभत नाही चारधाम !

सुटका होत नाही नात्यातुन 
मनुष्य शेवटी गोत्यात येतो
जसा जिवनाचा सारांश मांडत जातो 
तसा हा खेळ क्रुत्रिम वाटतो !

ईश्वराशी आपलं नातं जो जोडतो
तोच शेवटी सुखी होतो 
मोह माया पाश सोडून 
भगवंताशी एकरूप होतो !

ईश्वराशी नाते जोडेल जो
तो गोत्यात येत नाही 
त्याच्या आयुष्याचा धडा रिता रहात नाही...
हेच नाते ब्रम्हांडामधे खरे...
बाकी सर्व आहे वरचे वरे...


- अदिती नितीन देशपांडे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा