MMS वार्ता


क्रीडा दिन

जानेवारी २०१३ मधे महाराष्ट्र मंडळ सिंगापूर तर्फे विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणयात आले होतेत्या स्पर्धांचे निकाल खालीलप्रमाणे-

कॅरम
पुरुष (सिंगल्स)
प्रथम क्रमांक - चिंतामण लाड
द्वितीय क्रमांक - प्रशांत गोरेगावकर

बॅडमिंटन
पुरुष (सिंगल्स                                                                       महिला (सिंगल्स)
प्रथम क्रमांक - संजय पाटोळे                                                      प्रथम क्रमांक - अंजली लोटके
द्वितीय क्रमांक - विमल शर्मा                                                      द्वितीय क्रमांक - अनुराधा बामणोदकर

पुरुष (डबल्स)                                                                          मिक्स (डबल्स)
प्रथम क्रमांक - संजय पाटोळेविमल शर्मा                                    प्रथम क्रमांक - अंजली लोटकेअविनाश लोटके
द्वितीय क्रमांक - योगेश अफळेशिव गणिगा                                 द्वितीय क्रमांक - अभय तट्टूसंध्या तट्टू

बोलिंग
  • विजेती टीम - अभिजीत देशपांडे, अजित मुंगरे, राजा पायगुडे, मंदार सोनावणे
  • उपविजेती टीम - अविनाश लोटके, अंजली लोटके, किरण मुंगीकर, किरण संख्ये
  • सर्वाधिक गुणसंख्या (पुरुष)        १) अभिजीत देशपांडे     २) महेंद्र रायदुर्ग
  •  सर्वाधिक गुणसंख्या (स्त्रिया)     १) नुपुरा देशपांडे           २) अंजली लोटके
  •  सर्वाधिक गुणसंख्या (ज्युनियर)  १) जीत खासनीस           २) सुकन्या लोटके



शब्दगंध शतकपूर्ती

शब्दगंध! सिंगापूरमधे गेली आठ वर्षे अव्याहतपणे चाललेला कवितांना वाहिलेला उपक्रम. शब्दगंधी प्रत्येक महिन्याला एका शब्दगंधीच्या घरी जमतात आणि आधी निवडलेल्या तीन विषयांवर आपापल्या कविता सादर करतात. तर अशा या शब्दगंधची १०१वी मैफल मार्च महिन्याच्या २३ तारखेला शनिवारी जमली होती. १०१व्या मैफिलीच्या समारोहासाठी एक विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला. शब्दगंधीच्या स्वत:ला आवडलेल्या, आधी कुठेही प्रसिद्ध न झालेल्या कविता मागवल्या गेल्या. जुई चितळेने त्या सर्व कविता अतिशय समर्पकपणे निवेदनामधे गुंफल्या आणि १०१व्या मैफिलीत त्याचे सादरीकरण झाले. जुई चितळे आणि निरंजन नगरकर यांनी प्रभावी निवेदन केले आणि उपस्थित कवींनी स्वत:च्या कविता स्वत: सादर केल्या. काही परदेशस्थ कवींनी आपल्या कवितांची ध्वनीफितही पाठवली होती. त्यानंतर "शतक' या विषयांवरील कविताही सादर केल्या गेल्या. या महिन्याचे यजमान श्री. व सौ. डॉ. काळे यांनी अतिशय प्रेमाने आयोजलेल्या भोजनाने मैफिलीची सांगता झाली.





वाचनालय पुस्तक गणना दिन (Library Stock Taking)

महाराष्ट्र मंडळ सिगापूरचे छोटेसे वाचनालय आहे. ह्यात जवळ जवळ ३००० पुस्तके असून ४०० च्या वर सभासद या वाचनालयाचा लाभ घेतात. दरवर्षी वाचनालयातील पुस्तकांची गणना करून त्यांची परत साहित्य प्रकाराप्रमाणे मांडणी केली जाते. त्यात ललित, कथा, आत्मचरित्र, कविता, काल्पनिक कथांवर आधारित पुस्तके (fiction books), आध्यात्मिक, बालसाहित्य अशा विविध प्रकारात वर्गीकरणाप्रमाणे नवीन पुस्तकांना क्रमांक दिले जातात. २९ मार्च २०१३ रोजी वाचनालय संयोजक समीर कोजरेकर ह्यांनी स्वयंसेवकांच्या मदतीने वाचनालयाचे stock taking केले. या वर्षी वाचनालयामधे software automation झालेले असल्यामुळे बारकोडप्रमाणे पुस्तके क्रमवार लावण्याचे काम सोपे झाले. यावेळी १७ स्वयंसेवकांनी कामाला आपला मोलाचा हातभार लावला.



वार्षिक सर्वसाधारण सभा

वसंताचे तोरण बांधून येणाऱ्या नवीन मराठी वर्षात नवे उपक्रम व नवी आव्हाने हातात हात घालून येतात व त्याचे नेतृत्व व आव्हान पेलायला नवीन कार्यकारिणी येते. २३ मार्च २०१३ला क्वीन्स टाऊन्सच्या ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलमधे महाराष्ट्र मंडळ सिंगापूरच्या वार्षिक सर्वसाधारण सभेने जुन्या कार्यकारिणीला निरोप देऊन कार्यकारिणी २०१३ ची स्थापना केली. ह्या सभेमधे २०१२ चे अध्यक्ष श्री. प्रसन्न पेठे व कार्यकारिणी सदस्यांनी वर्षभर झालेल्या मंडळाच्या कार्यक्रमाचा अहवाल दिला व खजिनदारांनी वर्षभर झालेल्या जमाखर्चाचा आढावा घेतला. २०१२ चे लेखापरिक्षक (ऑडिटर) श्री. शैलेश दामले आणि श्री. सुरजीत मेहेंदळे ह्यांनी तपासलेला मंडळाचा वर्षभराचा आर्थिक अहवाल श्री. सुरजीत मेहेंदळे ह्यांनी सर्व साधारण सभेत सादर केला. त्यावर चर्चा होऊन एकमताने त्याला मंजुरी मिळाली. 

यानंतर सर्वात महत्वाचा कार्यक्रम म्हणजे नव्या कार्यकारिणीची निवड. ह्यात २०१२ कार्यकारिणीतील ४ सभासदांचा समावेश असून ९ नवीन सभासदांची बिनविरोध निवड झाली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा