टोमॅटो गाजर सूप

नेहमीच्या टोमॅटो सूप पेक्षा वेगळं, पौष्टिक आहार म्हणूनही चांगलं असं हे सूप -

साहित्य :
१. एक मोठा टोमॅटो,
२. एक गाजर
३. एक सफरचंद, साल काढून मधला भाग काढून
४.अर्ध छोट्या आकाराचं बीट
५.तीन चहाचे कप पाणी
६.अर्धा इंच आल्याचा तुकडा
७. एक छोटा कांदा
८. पाव कप दूध


कृती : 
१.गाजर, बीट, सफरचंद,कांदा, टोमॅटो तुकडे करून घ्या.
२. आल्याचा तुकडा घाला,३ कप पाणी घालून प्रेशर कुकर मध्ये सर्व उकडून घ्या.
३.थोडं गार झाल्यावर मिक्सर मधून काढून घ्या.
४.पाव कप दूध, मीठ, मिरपूड घालून उकळून घ्या. सफरचंद आणि बीट असल्यामुळे चवी साठी वेगळी साखर घालण्याची गरज नाही.
गरमच आस्वाद घ्या.



-राजश्री लेले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा