प्रथम प्रेम भावना

प्रकाश तु अनंती तु

अंधाऱ्या आकाशी निर्मितीची चाहूल तु

मेंदूच्या चौरंगी शब्दांचे युद्ध तु

निर्मित आकाशी चुंबकीय कृष्णविवर तु

चक्राकारी मंदाकिनी तु

विखुरलेल्या काळी पूर्वेचा देव तु

जीवकारक संयुगी वसुंधरा तु

कृष्ण शुद्धपक्षी कलामिती चांद्र तु

काळ्यामाती डोकावते अंकुर तु

पाण्यात घुसळती खडीसाखरेचे पाय तु

मातीच्यादेही ईश्वरी प्राण तु

स्त्रीच्या योनिकुंभी अर्भकाचे रूप तु

सागर भू अंबरी शिंपल्यात मोती तु

तुळस वृंदावनी फुलवातीची ज्योत तु

माळरानी काजव्यातील तारा तु

भूमंडळी प्रवाशी धूमकेतू तु

काळोख्या रात्री आगगाडीचा लाईट तु

अंतराळ रथी इंधनाची मशाल तु

आकाशी तरंगते अंतराळघर तु

लाल परग्रही मृदेचे कण तु

भूमीच्या उदरी कोळस्यातील हिरा तु

सरोवरात डबडबती मेनातील कमळ तु

सांजआरती कर्पूरी टेंभा तु

ढगांच्यालेणी कडाडती वीज तु

काळ्या मेघांनी शिंपडलेल्या गारा तु

डोंगरकपारी नाजूक निरझरा तु

ज्वालामुखी आगीच्या लाटा तु

मेणबत्ती कापसाचे रेशीम तु

पथदीपी एल इ डी तु

भुवनी रंगभरी रंगहीन प्रकाश तु

नेत्रपटली नक्षी ती सर्व प्रकाश तु

संध्याकाळी पहाटणारी मृगनयनी तु

भूमीचे सिद्धांती भुवर्तीनी तु

प्रकाशाच्या गाभ्यातील आर्तभावना प्रकट करण्याऱ्या तेजस्विनीच्या स्मृति ...



- प्रसाद मुळे

नाशिक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा