शब्द न झरले लेखणीतून
रंगही न वा शिंपले कुंचल्याने
रंगहीन शब्दाविण जणू
चहूकडे वाळवंट फुललेले
भवताली बहु मृगजळ
परी क्षुधा कशी मिटावी तयाने
मदारीत साठविलेले जल
नुरते आहे क्षयाक्षयाने
टाकोनी तंबू वसला
कबिला उगा इथे का?
क्षुधार्थ तनामनाने
विरामावे फुका, कसे का?
- अर्चना रानडे
Sundar.
उत्तर द्याहटवाछान!
उत्तर द्याहटवा"टाकोनी तंबू वसला
कबिला उगा इथे कां?"
हे कोण विचारतो आहे?