नवी पिढी


पूर्वीच्या काळी स्त्रियांना घराबाहेरही पडायची नव्हती मुभा
स्त्री-शिक्षणाचा पाया रचून, सावित्रीबाईंनी इतिहास केला उभा
इंग्रजकालीन हालअपेष्टांनी समाज गेला होता पिचून
गांधीजी, भगतसिंग आदी नेत्यांनी स्वात्रंत्र्य आणले खेचून
त्यांच्या सामर्थ्यापुढे तेव्हा इंग्रज झाले होते पराभूत
आजच्या पिढीला मात्र पछाडतय, त्याच इंग्रजी संस्कृतीचे भूत

छोट्याश्या स्वतंत्र कुटुंबात प्रत्येकाचेच स्वतंत्र विचार
मायेच्या विणिने मनं गुंफण्याची गरज आहे फार
आई- बाबा दोघेही झाले नोकरीच्या अधीन
लहानग्या मुलांना केले मग maid च्या स्वाधीन
संस्कार अन् रीती-रिवाजांचा झालाय चक्काचुराडा
WhatsApp, Facebook च्या जादूने घातलाय मुलांभोवती गराडा

नव्या पिढीच्या हातात पडली gadgets भरपूर
मनाने मात्र जात आहे ती आई-बाबांपासून दूर
जे मागतील ते मिळत गेले, त्यांना माहीत नाही नकार
मनासारखे घडलेच पाहिजे, याचा अट्टाहास फार

आजच्या branded वस्तूंच्या दुनियेने, मनाला पाडली आहे भुरळ 
कितीही पुंजी साठवली तरी, वाढत्या अपेक्षांसमोर कवडीमोल 
भरीत भर म्हणून वाढती महागाई, लावते समाधानाला गालबोट
'अजून' पैसे मिळवायच्या शर्यतीत, जुंपलेत सगळेच लोक 
क्षणभर विसावून, आयुष्याबद्दल बघावा का पुनर्विचार करून? 
सरते शेवटी आयुष्याच्या, कशासाठी बरं मन असेल आतुर? 

बँकेतील थप्पी अन् आधुनिक सुशोभित राजमहालापेक्षा 
सुशिक्षित संस्कारी अपत्यच खरी कमाई, हीच नसेल का अपेक्षा?


- सोनाली पाटील


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा