सोयीस्कर स्वातंत्र्य

एकाच घरातील लोक शोधतात सोयीस्कर  स्वातंत्र्य
कधी असतात एकत्र तर कधी जुळतच नाहीत तंत्र ।।१।।

सख्खे, चुलत, आत्ये, मावस भावंडांचा मोठा कुटुंब कबिला
विभक्त पध्दतीत सगळे सुखी म्हणून मग दूरूनच गोतावळा वाटे भला।।२।।

आई वडील आणि मुलांची सुंदर अशी चौकोनी चौकट
मुले मोठी होतात आणि दोघांनाही एकमेकांची होऊ लागते कटकट ।।३।।

अहो! इतकेच काय तर, सुरवातीला तुझ्यावाचून करमेना अशी असते नवरा बायकोची केस
पण काहीच काळात दोघांनाही हवी असते आपली आपली स्पेस ।।४।।

म्हणजे एकूणच काय प्रत्येकाचे स्वातंत्र्य बदलते सोयीनुसार

नकोत कुठली बंधनं नकोत मर्यादा फार हवा फक्त स्वैराचार।।५।।


-अमृता  महेश  कुलकर्णी

1 टिप्पणी: