विसरभोळा ससा

जंगलात एक छोटासा ससा राहात होता. त्याचं नाव हॅरी होतं. तो फार विसरभोळा होता, खूप गोष्टी विसरुन जायचा.

एक दिवस तो विसरुनच गेला की आईबरोबर त्याला फिरायला जायचे आहे. खेळण्याच्या नादात तो विसरुनच गेला की त्याला भूक लागली आहे, आणि मग तो जेवणाच्या शोधात निघाला तेव्हा त्याला अचानक एक कावळा मिळाला. तो त्या कावळ्याशी गप्पा मारु लागला. बोलण्या बोलण्यात हॅरी ने त्या कावळ्याला नाव विचारले. कावळा म्हणाला, "माझे नाव सॅम !! तुझे काय?" गमतीची गोष्ट म्हणजे हॅरी आपलेच नाव विसरला होता !!! 
तो विचारच करत बसला आणि कंटाळा येऊन कावळा उडूनपण गेला.

हॅरी इतक्या दूर निघून गेला होता की तो हरवलाच! त्याला आपला पत्ता पण आठवेना आणि मग तो भोकाड पसरुन रडू लागला. तेव्हा अचानक त्याची आई आवाज देत देत तिथे आली. आईला पाहून हॅरी खूष झाला. आई म्हणाली,“हॅरी तू परत विसरलास ना की आपल्याला फिरायला जायचे होते?” हॅरीला अचानक सगळे आठवले. आईची क्षमा मागून त्याने वचन दिले की ह्यापुढे तो आठवण ठेवून जबाबदारीने वागेल.

- ईहिता देशपांडे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा