लहर

थोड्या उमललेल्या, थोड्या कोमेजलेल्या
वास्तव्याच्या धगीने कोळपून गेलेल्या
थोड्या ओल्या.. थोड्या ठिक्क-कोरड्या
हरवलेल्या, विसरलेल्या, गमावलेल्या
वार्‍यावर सोडून दिलेल्या, अर्धवट पाहिलेल्या,
'इदं न मम' म्हणत अखेरीस टाकून दिलेल्या

सर्व सर्व स्वप्नांना..पुन्हा एकदा जाग आली!
फिरुन परत एकदा वसंत यावा
फांदी फांदी मोहरावी, फूल फूल दरवळावे
पान पान झळकावे, पक्षी पक्षी झाड व्हावे
तशी परत एकदा जगण्याची एक लहर आली...
...पुन्हा एकदा स्वप्नांना जाग आली












यशवंत काकड 


1 टिप्पणी: