संपादकीय


नमस्कार मंडळी,

सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा ! हे वर्ष तुम्हाला खूप आनंदाचं, भरभराटीचं, आरोग्याचं आणि सृजनाचं जावो ह्या सदिच्छा !! आत्तापर्यंत दिलीत तशीच नवीन वर्षातही ऋतुगंधला भरभरून साथ देत रहा. 

या वेळच्या अंकात साथीदार किंवा जोडीदार या विषयावर खूप वेगवेगळ्या दृष्टिकोनातून केलेले लेखन तुम्हाला वाचायला मिळेल. लग्नसंस्था, लग्न सोहळ्यातील परंपरा, माहेर-सासर आणि त्याची आपल्या आयुष्यातील गुंफण यांवरचे लेख तुम्हाला नक्कीच भावतील. तसेच आपल्या जोडीदाराविषयी, त्याच्यातच सापडलेल्या मित्राविषयी आणि उत्तरोत्तर फुलत गेलेल्या सहवासाविषयीही काही लेखकांनी आठवणी मांडल्या आहेत. 

हा अंक चाळताना आणि त्यातले लेख वाचताना तुम्हालाही आपल्या आयुष्यातल्या त्या खास व्यक्तीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. सर्वात जवळचं असं हे नातं, जे अनेक चढ-उतारांवरून जातं, चांगल्या-वाईट अनुभवांतून तावून सुलाखून निघतं. सुरुवातीच्या जादुई वाटणाऱ्या दिवसांपासून सुरुवात होऊन ओढ, मैत्री, विश्वास, प्रेम असे टप्पे ओलांडत अधिक दृढ होत जातं. या साऱ्याचा या अंकाच्या निमित्ताने आढावा घेता येईल. तेंव्हा तुम्हाला हा अंक कसा वाटला हे तुमच्या प्रतिक्रियांमधून आम्हाला नक्की कळवा. 

शिवाय नेहेमीच्या पाककृती, आरोग्यमं धनसंपदा, सिंगापूरच्या आठवणी या सदरांनाही भेट द्यायला विसरू नका. 


सस्नेह,

ऋतुगंध समिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा