महाराष्ट्र मंडळ सिंगापूर - वार्ता

सर्जनशील लेखन कार्यशाळा

११ जून २०१६ रोजी महाराष्ट्र मंडळातर्फे सर्जनशील लेखन कार्यशाळा भरविण्यात आली होती. मागच्या वर्षीच्या अश्याच कार्यशाळेला भरघोस प्रतिसाद मिळाला होता व त्याच्या पुढे जाऊन नवीन लेखकांना आणखी सखोल माहिती मिळावी, लेखनातील तंत्र आणि मार्गदर्शक तत्त्व माहित व्हावीत हा या वेळच्या कार्यशाळेचा हेतू होता. मार्गदर्शक डॉ. नीतीन मोरे यांनी कथा, कविता आणि ललित लेखन या वेगवेगळ्या लेखन प्रकाराविषयी सविस्तर चर्चा केली व उदाहरणांमधून, प्रश्नोत्तरांमधून विषय अतिशय छान उलगडत नेला. Linguistics म्हणजेच भाषाशास्त्रामध्ये Ph.D. मिळवलेले नीतीन मोरे हे अनेक वर्षे फेसबुकमध्ये Learning and Development विभागाचे मुख्य होते. त्यांचं 'एकलकोंड्याचा कबिला' हे कवितांचं पुस्तक गेल्या वर्षी प्रकाशित झालं आहे. या कार्यशाळेमध्ये १८ सभासदांनी भाग घेतला.

याच दिवशी 'ऋतुगंध समिती २०१५' च्या सभासदांचेही अध्यक्ष अस्मिता तडवळकर यांच्या हस्ते कौतुक करण्यात आले.


Acting workshop with प्रतिमा कुलकर्णी

सुप्रसिद्ध दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांची अभिनय आणि दिग्दर्शन कार्यशाळा ममसिं तर्फे २४ ते २६ जून दरम्यान घेण्यात आली. २४ जून रोजी लहान मुलांची तर २५ व २६ जून रोजी मोठयांची कार्यशाळा GIIS Queenstown च्या आवारात पार पडली. १३ मुले व १९ मोठ्यांनी त्यात सहभाग घेतला. मंजिरी कदम यांनी गेल्या वर्षी या कार्यशाळेची कल्पना मांडली होती व प्रतिमा कुलकर्णींबरोबर त्याची रूपरेषा आखून दिली होती. अभिनयाचे वेगवेगळे पैलू व दिग्दर्शनातील खुबी यांवर या कार्यशाळेत बरेच काम झाले. सर्व सहभागींना ममसिं तर्फे सहभाग प्रशस्तिपत्रक देण्यात आले.

या कार्यक्रमात स्मिता गाडगीळ व अपर्णा टेमुर्णीकर यांचे विशेष साहाय्य लाभले.




















- नलिनी थिटे 

परचुरीत - अतुल परचुरे यांचा एकपात्री प्रयोग

अतुल परचुरे यांचा एकपात्री प्रयोग - 'एक परचुरीत' १७ जुलैला ग्रासरूट्स क्लब येथे आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात त्यांनी 'परवा आमचा पोपट वारला' या कथेचे अभिवाचन केले तसेच एक कलाकार व माणूस म्हणून एवढ्या वर्षात भेटलेल्या वेगवेगळ्या नमुन्यांविषयी गंमतीशीर अनुभव सांगितले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात त्यांच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीवर नजर टाकत जाहिरात, नाटक, चित्रपट व मालिका या विविध माध्यमांमध्ये काम करताना साकार केलेल्या भूमिका व अनुभव यांचा आढावा घेतला. कार्यक्रमाला १५० सभासद उपस्थित होते.


अभिनय - निवड चाचणी 

दर वर्षीप्रमाणे या वर्षीदेखील एक मोठ्यांचे नाटक व एक बालनाट्य करण्याचा ममसिं चा मनसुबा असल्याने त्यासाठी कलाकारांची एक निवड फेरी ३१ जुलै रोजी घेण्यात आली. लहान, मोठे कलाकार व स्वयंसेवक अशा ५० जणांनी त्यात नाव नोंदणी केली होती. २५ मोठे व १५ छोटे कलाकार निवड चाचणीसाठी आले. दिग्दर्शक अमित जोशी (मोठयांचें नाटक) व चंदन आंगणे (बालनाट्य दिग्दर्शिका) यांनी ही निवड चाचणी घेतली. ममसिं तर्फे अस्मिता तडवळकर, नलिनी थिटे, पुष्कर प्रधान, विशाल पेंढारकर व स्मिता अंबिके यांनी काम पाहिले.

निवड चाचणीचा निकाल १ ते २ आठवड्यात सर्वांना कळवण्यात आला.














- नलिनी थिटे 

आगामी कार्यक्रम 

  • संतवाणी - १३ ऑगस्ट, संध्याकाळी ६ वाजता. सीफाज ऑडिटोरियम 
  • गणेशोत्सव 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा