सुहास्य तुझे मनासी मोही

सुहास्य तुझे मनासी मोही
जशी दिसता ठेल्यावरी तू
इच्छा होते प्रबळ मानसी
गाडी वळते आपसुक दिशी

हाथी घेऊन छोटी थाळी
ठेल्यावरती रांग निराळी
भैय्याजीमग फोडूनी तिला
तिखट आंबट पाणी संगतीला

ब्रह्मांडात मग तिचे आगमन
चवथी जाता सुखावते मन
संगतीस ही शेव अन् कांदा
करणे मोजमाप भलताच वांधा

एक डझनही अपूरी भासते
दुजीचीही गरजच नसते
तरीही मग भैय्यास मागतो
फुकटची शेवपुरी आपण चोपतो

तृप्तीचीही ढेकर येता
डायटिंगची मग आठवण होते…

डायटिंगची मग आठवण होते…
- नंदिनी नागपूरकर


२ टिप्पण्या: