कविता - जोडीदार

श्वासा इतकं महत्वाचं आणिक काय, असं जर कुणी 
मला विचारलं, तर मी म्हणेन विश्वास.
मैत्री, नाती पक्की तेव्हाच 
जेव्हा असतो, गाढ विश्वास.
अशाच एका शांत क्षणी, 
त्यानी माझा हात हातात घेतला.
एकही शब्द न बोलता.
सगळीकडे नीरव शांतता.
ते डोळेच इतकं बोलून गेले,
कि शब्दांचे काही महत्वच नाही उरले.
त्या स्पर्शातच एक आश्वासन होतं,
भक्कम विश्वासचं नातं होतं.
मग मीही त्याचा हात हातात घेऊन,
चालत राहिले एका मखमली वाटेवर,
कधीही न संपणाऱ्या.


- मेघना असेरकर

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा