अनोळखी

बाहेरून दिसतात सारखे
बाहेरून वागतात सारखे
पण काय लपले आहे मनी
इतके खोल पाहिले तरी कोणी?

एक उजवा, एक डावा
वाटते त्यांना आहे मोह वेगळा 
वेगळ्या दिशेस नजर फिरवतात हे डोळे
पण वाट तर एकच चालतात हे भोळे..

डाव्याची अडली दृष्टि जरी,
उजवा चालत राहतो त्याची वाट
डाव्याची गरज नाही असा असतो विश्वास,
पण एकट्याला दिसतो अर्धाच प्रकाश..

न आहे ओळख 
न पाहिले एकमेकांना
तरीही एकत्र जगतात हे डोळे,
एकमेकांनवर अवलंबुन राहतात हे भोळे..

नाही गरज खोल पाहण्याची
नाही गरज जाणून घेण्याची
आहेत ते समुद्राची एक लाटएक वेगळेच नाते, वेगळीच गाठ...


- अनुष्का  कुलकर्णी


1 टिप्पणी: