आज पुसट पुसट ….

आज पुसट पुसट 
भासे जीवनाची वाट 
जणु मृगजळ असे 
मिरवित खोटा थाट !

शब्द नसे ओठांवर 
थरथरती सारे स्वर 
मनी दाटले सागर 
डोळे पाण्याचेच घर !

विचाराया असे सोपे 
असे समजाया जड 
आज संपत का नाही 
हा वेदनांचा गड !

बघ पाऊले चालती 
आज मनाला सोडून 
भोळे मनही थांबते 
सारे बंधन तोडून!

ठेच लागते जीवास 
होई जीव कासावीस 
गूढ रुजती ते घाव 
देई त्रास आत्म्यास !

कर संकटांना ठार 
कर दुःखांवर वार
झेल अलगद सारे 
दे ना स्वतःला आधार !!



- मुग्धा जहागीरदार 



८ टिप्पण्या: