चित्रकथा

लहानपणापासून कॅमेऱ्याबद्दल कुतूहल वाटायचं. पण कॅमेरा फिल्म रोल, डेव्हलपिंग इत्यादी मुळे खूप फोटो काढणं शक्य व्हायच नाही. माणसांचे निरीक्षण करणे, प्रवास करताना ते क्षण मनात साठवणे हीच करमणूक होती. पुढे डिजिटल कॅमेरा हातात आला आणि खूप फोटो काढण्याचा छंद पुरा करता येऊ लागला. पण तरी कॅमेरा नेहमी बरोबर नसायचा. 

मग मात्र मोबाईल फोनने माणसाच्या आयुष्यात क्रांती घडवली. आपला वेळ वाचवण्याचं एक साधन म्हणून निर्माण केलेला हा फोन आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक कधी बनला हे समजलच नाही. त्यामध्ये असलेल्या अनेक फिचरपैकी कॅमेरा हा सर्वात लोकप्रिय. कुठेही गेलं तरी डोळ्यांनी एखादी गोष्ट पाहण्याच्या ऐवजी ती कॅमेऱ्यातुन पाहण्यातच जास्त मौज वाटू लागली आहे. मग ते खाद्यपदार्थ असोत किंवा निसर्ग सौंदर्य. तो क्षण कॅमेरात बंदिस्त करणे हाच छंद झालाय जणू करमणुकीचे एक साधन.

आता हेच पहा ना ह्या गोड मुलींना पाहताच फोटो घेण्याचा मोह आवरता आला नाही. 



- राजश्री लेले

1 टिप्पणी:

  1. आणखी फोटो टाकायचे की!
    तुमची फोटोग्राफी पहाणे ही एक ट्रीट असते!

    उत्तर द्याहटवा