परिवार वार्ता

डॉ नीतीन मोरे यांचा उन्मेष प्रकाशनाने छापलेला "एकलकोंड्याचा कबिला" हा पहिला काव्यसंग्रह १५ मे ला
पुण्यात प्रकाशित झाला. प्रकाशनाला ज्येष्ठ समीक्षक डॉ रमेश धोंगडे, अभिनेत्री सौ मानसी मागीकर आणि प्रकाशिका मेधा राजहंस हे मान्यवर उपस्थित होते. "नीतीन मोऱ्यांची कविता ही भावकविता आणि विचारकवितेच्या सीमारेषेवर उभी आहे. तिचा प्रवास पुढे विचार कवितेच्या दिशेनी व्हावा" अशी इच्छा डॉ धोंगडे यांनी प्रकट केली. "खूप दिवसांनी चांगल्या कविता वाचायला मिळाल्याचा आनंद ह्या कवितांनी मिळेल" असा आशावाद मेधा राजहंस यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मानसी मागीकर आणि नीतीन मोरे यांनी काही कवितांचं वाचन तर गायिका मधुरा दातार हिनं जितेंद्र कुलकर्णी यांनी काव्यसंग्रहातल्या काही कवितांची केलेली गाणी सादर केली. "एकलकोंड्याचा कबिला" वर आणखी माहिती या फेसबुक पेजवर उपलब्ध आहे.
www.facebook.com/ekalkondyachakabila

1 टिप्पणी: