निरागस बालपण

इवल्याश्या स्वप्नांचं जग 
असतं फार छान
नसतं कधी तिकडे 
रियॅलिटीचं भान

आपण फक्त आपले असतो 
नसतं कधी कोणत्या 'रॅट रेस'चं ज्ञान
हरलो जरी पुन्हा पुन्हा 
तरी सहभागाचं असतं मनोमन समाधान 

चकमक झगमग ग्लॅमर टुकार वाटतं 
जेव्हा भिनतो श्वासाश्वासात 
गंधाळलेल्या मातीचा वास

आईबाबांचा गाडी बंगला 
आयफोन फिका पडतो
जेव्हा दिवाळीतला चिखल मातीचा
किल्ला पटकावतो मान 

हल्ली तर सगळं जग बदलतंय 
पण अजूनही बालपण तसंच आहे 
या धकाधकीच्या जगात फक्त 
बालकांचंच हास्य सच्च आहे

ते गोंडस, निरागस हास्य पाहता
मनोमन वाटते एकच गोष्ट
पुन्हा कधी मिळेल का,
ते निरपेक्ष बालआयुष्य?

- दीपिका कुलकर्णी


२ टिप्पण्या: