छंदानंद

करमणूक म्हणजे छंद,
आपल्याला हवा तसा गंध,
वेळ घालवण्याचे हे एक साधन,

हे असले तर दुसरे काहीच नको धन,
करमणूक एकट्याचाच नाही खेळ, 
कधी कधी घोळक्यातही जातो वेळ,

करमणूकीचे आहेत नाना प्रकार, 
प्रत्येकाच्या मनाप्रमाणे घेते आकार, 
विविध कलांचा येथे होतो उगम, 
कधी कधी करमणूक पण बनते 
दिनचर्येचं साधन, 

जो आपले जोपासतो छंद,
त्याचा हिरावू शकत नाही आनंद,
करमणुकीला नसते कुठलेही वय,

आपल्या मनाप्रमाणे वाजते लय,
करमणूक आहे मनीचा ध्यास, 
सारखी मनाला तीच आस,

करमणुकीचे ना कुठले वय, 
ना कुठली जात,
सर्वांना समावून घेते
करते मनोरंजन अहोरात,

करमणूक ही करमणुकच रहावी,
होवू नये त्याचा टाईमपास, 
जीवनाचे होईल पोतेरे, 
होईल नाहीतर ऱ्हास,

करमणुकी सारखे दुसरे नाही साधन,
हिच्या माध्यमातुन माणसांचे एकत्र जुळते मन,

कुणी रमतो फिरण्यामध्ये, 
कुणाला सिनेमाचे वेड,
वाचन, पत्ते आणि जोक्स, 
तर कुणास आवडतात रंगांच्या शेड,
नृत्य नाटके व पाककलांना पण येथे वाव,

फोटोग्राफी व पर्यटन पण 
करमणुकीचाच आहे भाव
माणसाने करमणूक स्वःताची करावी
आणि दुसऱ्याचीही,

दुसऱ्याच्या कलेचा आदर असावा
आणि आवडीचाही,
करमणूकीलाही जीवनात द्यावे मोठे स्थान, 
मग एकाकिपणाचे होते सहजच प्रस्थान,

सप्तरंग आहे ही करमणूक, 
रंग तीचा जाणून घ्या
आपली रंगछटा ओळखुन,
जीवनाचा ध्यास घ्या
- अदिती देशपांडे






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा