स्वातंत्र्य

आपले वागणे ते स्वातंत्र्य असते,
त्यानी मात्र सोडले ताळतंत्र असते
आपले स्वातंत्र्य, स्वातंत्र्य असते,
मनासारखे वागायची हिंमत असते

आपले बोलणे ते स्वातंत्र्य असते,
दुसऱ्याचे उत्तर मात्र हुज्जत असते.

रहदारी नियमांतून सूट हवी असते,
ते इतरांनी पाळायची जरुरत असते

उत्पन्न सगळ्यांना लपवायचे असते,
दुसऱ्याची करचोरी नजरेत खुपते
 
मला वाट्टेल ते विकत घ्यायचे असते,
दुसरा घेतो तेव्हा लाचलुचपत असते

स्वातंत्र्य मुळात कधी अमर्याद नसते,
समजात त्याची सीमा निश्चित असते.

बंधनांची शिस्त काही पारतंत्र्य नसते
स्वातंत्र्याची मोजलेली ती किंमत असते.
स्वातंत्र्याची मोजलेली ती किंमत असते.


-अरुण मनोहर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा