बीटरूट पॅटीस चाट रेसिपी

साहित्य:

वाफवलेले मटार १ वाटी 
वाफवलेले बीटरूट १ वाटी 
उकडलेले बटाटे ५ 
किसलेले आले १ चमचा 
मिरची कोथिंबीर पेस्ट १ चमचा 
आमचूर पावडर १/२ चमचा 
धणे-जिरे पावडर १ चमचा 
रवा २ चमचे 
बटर १ चमचा 
चाट मसाला, मीरपूड चवीनुसार 
मीठ चवीनुसार 
हळद १/२ चमचा 
हिंग पाव चमचा 
नायलॉन शेव 
केचप 
तेल 



कृती:

प्रथम वाफवलेले बीटरूटकिसून त्यावर चिमूटभर मीठ व चाट मसाला टाकून बाजूला ठेवावे. 
पॅन मध्ये बटर टाकून हिंग, आले व मिरची कोथिंबीर पेस्ट टाकावी. 
मग वाफवलेले मटार टाकावेत. त्यावर मीठ, मीरपूड, आमचूर, पावडर टाकून मटार थोडे मॅश करावेत. हे मिश्रण बाजूला काढून ठेवावे. 
आता उकडलेले बटाटे कुस्करून त्यात हळद, मीठ टाकून नीट मिक्स करावे. या मिश्रणाचे अंड्याच्या आकाराचे गोळे करावेत. 
बोटाने मध्यभागी दाबून, या गोळ्यांमध्ये सारण भरावे. प्रथम मटारचे सारण पसरावे व नंतर मध्यभागी बीटरुटचे सारण भरून करंजी सारखा आकार करावा (म्हणजे पूर्ण बंद करू नये)
आता हा पॅटीस रव्यात घोळवून मंद आचेवर शॅलो फ्राय करावा (गोल्डन ब्राउन होई पर्यंत). 



टीप :

१. पॅटीस सर्व्ह करताना त्यावर चाट मसाला, दही व नायलॉन शेव टाकावी. सोबत हिरवी चटणी व टोमॅटो केचप सर्व्ह करावे. 
२. बीटरूट व मटार ऐवजी आपण त्यात स्वीट कॉर्न व चीज घालू शकता. 


आपले चटपटीत बीटरूट पॅटीस तयार !





- सौ. निकिता खडकबाण 

मुलुंड, मुंबई


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा