महाराष्ट्र मंडळ सिंगापूर - वार्ता

भोंडला आणि दांडिया
३० सप्टेंबर २०१७, शनिवार रोजी मंडळाने GIIS क्वीन्सटाऊन शाळेमधे भोंडला आणि दांडिया ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आधी भोंडल्याची पारंपरिक गाणी आणि नंतर जुन्यानवीन हिन्दी गाण्यांवर दांडियाचा आस्वाद आपल्या सभासदांनी घेतला. उत्कृष्ट वेशभूषा आणि नृत्य-कौशल्य यासाठी विशेष पारितोषिके देण्यात आली. 


मराठी चित्रपट उबुंटू
१५ ऑक्टोबर २०१७, रविवार रोजी मंडळाने महाराष्ट्रात सर्वत्र गाजत असलेल्या उबुंटू चित्रपटाचे आयोजन केले होते. खास छोट्या बालमित्रांसाठी असलेला हा चित्रपट जेवढा मंडळाच्या छोट्या मुलांना आवडला तेवढाच मोठ्यांनाही आवडला.

दिवाळी

रविवार, २२ ऑक्टोबर २०१७ रोजी मंडळाने दिवाळी साजरी केली. ह्यावेळी दिवाळीचं प्रमुख आकर्षण होतं - 'सैराट झालं जी ...!" हा कार्यक्रम. मंडळातील स्थानिक गायक आणि वादक कलाकारांनी सर्वपरिचित प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल ह्यांनी संगीतबद्ध केलेली एक से बढकर एक गाणी तालासुरात सादर करुन प्रत्येक गाण्याला वाहवा मिळवली. दिवाळीचा असा हा संगीतमय श्रवणीय कार्यक्रम सिंगापूर पॉलिटेक्निक ऑडीटोरीयम ह्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. 

आपल्या मंडळाचे तरुण सभासद अक्षय अवधानी आणि अनीशा म्हैसाळकर ह्या दोघांनी ह्या कार्यक्रमाचे संगीत दिग्दर्शन केले होते. श्रोत्यांच्या कडकडाट टाळ्यांनी ह्या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराचे कौतुक झाले होते. अक्षय अवधानी ह्यांनी ह्या कार्यक्रमाचा प्रवास आणि त्यामागची प्रत्येक कलाकाराची तयारी अतिशय सुरेख शब्दात वर्णन करुन श्रोत्यांना सांगितली.
ह्या बहारदार कार्यक्रमाची अथपासून इतिपर्यंतची क्षणचित्रे आपण इथे बघू शकता: https://www.facebook.com/media/set/set=a.1706661406042928.1073741966.110851955623889&type=1&l=4e0798c19e


सहभाग
Tanjong Pagar GRC येथे झालेल्या दिवाळीच्या कार्यक्रमात मंडळसुद्धा सहभागी झाले होते. मंडळाच्या सभासद वर्षा पाटिल ह्यांना वारली चित्रकलेचे प्रदर्शन ठेवले होते. अमृता कुलकर्णी, महिमा भागवत, हिमानी वीज, अपूर्वा वीज, वीणा जोशी, भारती चौधरी अणि शोना पिंपळशेंडे ह्या मुलींने अस्सल मराठमोळी नृत्यही सादर केले. 

कोकण मराठी साहित्य परिषद
कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या तर्फे आयोजित साहित्यसंवाद सिंगापूर येथे ८ नोव्हेंबर २०१७ रोजी संमेलनाध्यक्ष पद्मश्री मधू मंगेश कर्णिक व को म सा प चे ४९ साहित्यिक यांच्या उपस्थितीत पार पडला. मंडळाच्या शब्दगंध उपक्रमातील निवडक कवी मंडळींनी आपल्या कविता ह्या परिषदेत सादर केल्या. तसेच मंडळाच्या विविध सभासदांनी बोलीभाषेच्या लहेजासंबंधित कार्यक्रम ह्या परिषदेत सादर केले आणि सर्व प्रेक्षकांना ते खूप आवडले.


आगामी कार्यक्रम
१. 'चला हवा येऊ द्या'
दिनांक: शुक्रवार, ५ जानेवारी २०१८
स्थळः कलांग थिएटर
१, स्टेडिअम वॉल्क,
सिंगापूर - ३९७६८८

२. आजीव सभासद सभा

३. 
ग्रंथालय दिवस 


- यशवंत काकड


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा