वरणा रे...वरणा रे...

( हिंदी गीत वतना वे ... वतना वे ( फिल्म पिंजर ) च्या चालीवर एक विडंबनपर कविता ) 

वरणा रे ... फोडणीच्या वरणा रे 
वरणा रे ... आवडीच्या वरणा रे .. 
किती खमंग स्वाद तुझा , प्रिय पदार्थ तू माझा 
ताटात तुजला पाहुन जिभलीस पाणीच सुटतय रे ... 
वरणा रे ... फोडणीच्या वरणा रे ... 


गरमगरम भातावर , साजुक तूप आणिक ते वर 
गटा गटा गोळे गिळण्यास बघ हे , हात शिवशिवतात रे ... 
वरणा रे ... फोडणीच्या वरणा रे ... 


किती स्वादिष्ट तू मस्त, बायकोचे लागताच हस्त 
घरच्या जेवणाची सर त्या हॉटेलच्या चरण्यात कुठली रे ? ... 
वरणा रे ... फोडणीच्या वरणा रे.... 


कांदे टमाटे टाकून, शेंगा शेवग्याच्या टाकून 
फुरक्या मारुन पिण्या जोगे , सांबार होतोस रे ... 
वरणा रे ... आवडीच्या वरणा रे ... 


फोडणी ती तडतडून, तडका लसणाचा मारुन 
तिखा लालचा रंग चढवुन, तर्रच असतोस रे .... 
वरणा रे ... फोडणीच्या वरणा रे.... 


मऊ पोळया कुस्करून, छान तुझ्यात त्या बुडवून 
स्वाहा करताना मराठी जेवण, अव्वल वाटतय रे .... 
वरणा रे ... फोडणीच्या वरणा रे .... 


दोन रूपे तुझी रसाळ, तुर अन मसुरीची डाळ 
मिटक्या मारून, बोटे चाखुन, मन तरी किती हावरे .... 
वरणा रे ... फोडणीच्या वरणा रे... 


कधी साधाच जरी भेटतोस, रुचकर तरी किती असतोस 
साधेच जीवन सुंदर सत्य, पटवून देतोस रे ... 
वरणा रे ... फोडणीच्या वरणा रे 
वरणा रे ... आवडीच्या वरणा रे .. 


किती खमंग स्वाद तुझा, प्रिय पदार्थ तू माझा 
ताटात तुजला पाहुन जिभलीस पाणीच सुटतय रे ... 
वरणा रे ... फोडणीच्या वरणा रे .... 

- नंदकुमार देशपांडे


1 टिप्पणी: