कधी कळलचं नाही...

चार-आणे, आठ-आणे देवून
गोळ्या-बिस्किटं खायचो,
कॅशलेस होऊन कर्जबाजारी झालो
कधी कळलचं नाही...

सकाळी उठल्यावर गरम पाणी
प्यायचो, व्यायाम करायचो,
मोठमोठाली औषधे घेतो
कधी कळलचं नाही...

दिवाळीत चिवडा-चकल्या
खाऊ म्हणून मस्त खायचो,
त्यांना आता चखना म्हणतो
कधी कळलचं नाही...

लहानपणी मोगली-शक्तिमान
आनंदाने पाहायचो आम्ही,
नसतो वेळ जगायला आता,
कधी कळलचं नाही...

विटी-दांडू, कबड्डी, क्रिकेट
मैदानी खेळ खेळायचो,
ग्याझेटसच्या विळख्यात अडकलो
कधी कळलचं नाही...

व्यस्त झालो आम्ही
नाही सुख कशातच,
लहानपण निसटून गेले
कधी कळलचं नाही...

- प्रफुल्ल मुक्कावार



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा