- जाग -

जाग आली तेव्हा 
डोहातलं खळाळतं पाणी
शांत झालं होतं.

मिटल्या डोळ्यात मावत नव्हता
तो काळसर हिरवा खोल डोह
डोहाचे कणखर काठ ढवळून काढणारं नीळंशार पाणी
पाण्यावर तरंगतं चिरंजीवी कृष्णकमळ..

जाग आली तर
खळाळतं पाणी शांत
डोहाचा काठ सुस्तावलेला
पण कृष्णकमळाची निळाई 
तिच्या डोळ्यात उतरलेली
अन् पाण्यावर उरलेला
दृश्य मोतीया फेस..

मग होतं ते स्वप्न नव्हतं
का आली होती ती जाग नव्हती

साक्ष काढायचीच तर 
अदृश कृष्णकमळाची 
आणि 
त्या चिरंतन निळाईची.
- मोहिनी केळकर

1 टिप्पणी:

  1. खूप आवडली कविता..
    साक्ष काढायचीच तर अदृश कृष्णकमळाची आणि त्या चिरंतन निळाईची ….
    क्या बात है!

    उत्तर द्याहटवा