कोरं पान

नाही माहीत...मला काय झालंय, 
आयुष्य माझं पूर्ण बदलूनच गेलय,
हळुवारपणे तू आयुष्यात आलीस,
आणि अगदी नकळत माझी झालीस. 

तोच तो मी आणि तेच ते सगळं,
झालय मात्र विश्व पूर्णपणे वेगळं,
तूच जीव, तूच प्राण, तूच श्वास, 
जिकडे तिकडे होतो तुझाच भास. 

सारखं तुझ्याशी बोलायचं असतं,
कितीही बोललं तरी पुरेसं नसतं, 
जरी असलं सगळं काही छान,
तुझ्याविना जीवन म्हणजे कोरं पान. 

तुझ्या आठवणींनीच भरायचय हे कोरं पान,
उरलेलं आयुष्य मग नक्कीच जाईल छान !!



- सतीश सप्रे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा