परिवार वार्ता









Why do Indians …? पुस्तक प्रकाशन


विवेक वैद्य यांचे लेखनाच्या क्षेत्रात पदार्पण ठरलेले "Why do Indians...?" हे पुस्तक १८ ऑक्टोबर रोजी सिंगापूर
 
येथे प्रसिद्ध झाले. विवेक वैद्य हे सिंगापुर येथील एका सल्लागार कंपनीत काम करतात. ज्या भारतीयांचा इतर देशातील लोकांशी संबंध येतो त्यांना नेहमी "भारतीय लोक arranged marriage का करतात?” किंवा “गोमास का खात नाहीत? किंवा “शाकाहारी का असतात" असे अनेक प्रश्न वारंवार विचारले जातात. या प्रश्नांना समर्पक परंतु विनोदी धाटणीतली उत्तरे लघुकथातून देण्याचा प्रयत्नया पुस्तकाद्वारे केला गेला आहे. या पुस्तकाला श्री अविनाश धर्माधिकारी यांची प्रस्तावना असून त्यात या पुस्तकाद्वारे जागतिक भारतीय तयार करण्यास मदत होईलअसे त्यांनी लिहीले आहे. हे पुस्तक eBook स्वरूपात अमेझॉन, iBooks, कोबो इत्यादि सर्व प्रमुख संकेत स्थळांवर आहेच. या पुस्तकाला प्रकाशन पूर्व खुप ऊत्तेजन मिळालेले असून दहा देशांमध्ये या पुस्तकाच्या ५०० पेक्षा जास्त प्रती विकल्या गेल्या आहेत. सिंगापुरमध्ये हे पुस्तक लवकरच सर्व दुकानांमध्ये उपलब्ध होईल. खाससवलतीच्या दरात प्रकाशकांकडून paperback प्रत मागवण्यासाठी provient@gmail.com ला लिहा. अधिक माहिती साठी खालील संकेत स्थळावर संपर्ककरावा www.vivekvaidya.com/why-do-indians-the-book/ & www.facebook.com/whydoindians



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा