जोडीदार

"Marriages are made in heaven" ही म्हण माझ्या आयुष्याला अगदी तंतोतंत लागू पडते. Miss India, modeling, जगभरचा प्रवास, देशातील तसेच अंतर्देशीय modeling assignments, fashion weeks, चित्रपट, मराठी टेलिव्हिजन, radio mirchi music award nomination as a singer, hobby flying, पायलटचं license, असे बरेच काही गेल्या दहा वर्षांच्या वाटचालीत मिळवल्यानंतर कुठेतरी आयुष्यात साथीदाराची उणीव भासू लागली. आई-वडील आणि भावंडांची जागा कुणीच घेऊ शकत नाही, पण आपलंसं म्हणत कुरवाळत येणारा मित्र, दुःखाच्या क्षणी ज्याच्या खांद्यावर ढसाढसा रडता येईल, सुखाच्या क्षणी जो माझ्यासोबत खदखदून हसेल, माझ्या यशाची वाहवा करून जो पाठीवर थाप देईल, तर अपयशात मला प्रोत्साहन देऊन, निडर होऊन ताठ मानेने अजून मेहनत करण्याची प्रेरणा देईल, लहान निरागस मुलासारखा मिश्कीलपणा करणारा, तर कधी धीरगंभीर होऊन हुशारीचे निर्णय घेणारा, विश्वासू मित्र, romantic प्रियकर, मनात घर करून राहील असा माझा MR. RIGHT कुठे बरं असेल?

असं म्हणतात कि तुमच्या आयुष्यात गोष्टी तेव्हाच घडतात कि जेव्हा तुम्ही त्या गोष्टींची जबाबदारी घ्यायला समर्थ आणि तयार असाल. मी आयुष्याच्या अश्या काही वळणावर येऊन पोहोचले होते की फॅशन शोज, शूटिंग्ज, त्याच त्याच glamorous parties, पेपरात दार आठवड्याला photos ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तोचतोचपणा वाटू लागला होता. 

ज्यो ऑफिस मधून कधी येतोय ह्याची वाट पहात, कित्येक वर्षांनी प्रियकराची भेट व्हावी तसे उड्या मारत त्याच्या मिठीत शिरणे, रविवारी मस्त सासूच्या हाताचे मटण खाऊन सोफ्यावर 90s चे चित्रपट पहात ज्योच्या कुशीत डुलकी काढणे, gym ला, swimming ला एकत्र जाणे येता येता S.P.D.P., पुण्याची मिसळ, किंवा मनीषाचा डोसा, टेकडीवर हातात हात घालून sunset पाहण्याचा आनंद, college नंतर तब्बल १० वर्षांनी दादरच्या टपरीवरचा चहा आणि शिवाजी पार्कची रस्त्यावरची भेळ असे छोटे छोटे क्षण आम्हाला एकमेकांच्या प्रेमात कधी पाडत गेले, कळलंच नाही!

चार एक महिने एकत्र वेळ घालवल्यानंतर मित्रमैत्रणींसोबत आम्ही गोव्याला जाण्याचा प्लॅन केला आणि अचानक समुद्रकिनारी सूर्यास्ताच्या वेळी अगदी romantic  होऊन ज्यो ने मला filmy style ने गुडघ्यावर बसून लग्नासाठी propose केले आणि आम्हाला आमच्या जीवनाचा जोडीदार एकमेकात दिसला. 

प्रेमाची नवीन नवलाई सुरु झाली. चांगला स्वभाव, सद्गुण हे हवेहवेसे वाटतात, त्यामुळे पत्रिकेत किती गुण जुळतात ह्यापेक्षा आमच्या स्वभावातील किती गुण जुळत नाहीत आणि त्यासकट एकमेकांना कसे आपलेसे करून समजून घ्यायचे याला आम्ही महत्व दिले. 

रूप, रंग, ऐश्वर्य, पैसा, सामाजिक स्थान या गोष्टींना भुलून लग्न करण्यापेक्षा हे अलंकार बाजूला सारून ज्यो माणूस म्हणून कसा आहे हे पाहणं मला जास्त महत्वाचं वाटलं. जशी एक स्त्री कुणाची तरी बहीण, मैत्रीण, प्रेयसी, सून, मुलगी आणि आई असते, तसा प्रत्येक पुरुषही अनेक नाती जपत असतो. आई वडिलांना सोडून नवीन संसार सुरु करण्यासाठी आपले जग सोडून आलेल्या आपल्या पत्नीसाठी नवऱ्याच्या मनात बापाची माया आणि आईचे सामंजस्य आहे का, हे गुण जुळणे हे लग्न करताना पत्रिका जुळवण्यापेक्षा जास्त महत्वाचे आहे.                

प्रामाणिकपणा, सहनशीलता, संयम, दुर्लक्ष करण्याची क्षमता, क्षमाशीलता, फक्त शाररिरीकच नव्हे तर मानसिक एकनिष्ठता हे शब्द आजकाल फक्त dictionary मधेच  पाहायला मिळतात. कदाचित सध्या होणाऱ्या तरुण जोडप्यांमधील वाढत्या घटस्फोटांचे कारण हेच असावे. काळात नकळत माणसाचा वापर वस्तूंप्रमाणे, आणि वस्तू माणसांप्रमाणे वापरल्या जाताहेत का? तुटलं, जुनं झालं, कंटाळा येऊ लागला, त्या नात्यांना आता नावीन्य राहिलं नाही किंवा तो आनंद, उत्साह त्यात राहिला नाही, त्यामुळे वापरलेल्या खेळण्याप्रमाणे त्याला फेकून द्यावे असंच काहीसं होतंय का? यश, पैसा याच्या हव्यासामागे वाहवत जाऊन माणूस हळवेपणा, मनाचा संवेदनशीलपणा, दुसऱ्यांच्या भावना समजून घेण्याची क्षमता, आणि प्रत्येक माणसाकडे दयेच्या, प्रेमाच्या नजरेने पाहण्याची क्षमता गमावत चालला आहे का? अश्या अनेक प्रश्नांचे काहूर मनामध्ये माजते आणि अस्वस्थ करते. 

माझ्या गैरवागणुकीचा जोडीदारावर काय परिणाम होईल आणि तीच गैरवागणूक त्याच्या हातून झाली तर माझे मन किती दुखावेल हा विचार सतत मनात ठेवून वागले तर एकेमकांना sorry म्हणण्याची पाळी येणारच नाही. बऱ्याचश्या स्त्रिया हल्ली 'स्त्री-पुरुष समानता' ह्या नीतिमूल्याचा अर्थ पार चुकीचा घेताहेत. माझ्या मते स्त्री आणि पुरुष हे कधीच सामान होऊ शकत नाहीत. ते गाडीच्या दोन चाकांसारखे आहेत. एका चाकाचे अस्तित्व गेले कि दुसऱ्याच्या अस्तित्वाला अर्थच उरत नाही. दोघांचे अस्तित्व आणि निसर्गाने दिलेल्या क्षमताच वेगवेगळ्या आहेत. मलाही पुरुषाप्रमाणे जगता येईल असा अहंकार ठेवण्यापेक्षा ज्या गोष्टी एक स्त्री म्हणून मी करू शकेन आणि कदाचित पुरुष ते करू शकणार नाही त्या गोष्टींना मी न्याय देऊन माझं स्त्रीत्व जपतिये का? ऑफिसच्या कामाने थकून घरी आलेल्या नवऱ्याला, शाळेतून थकून शिणून आलेल्या मुलाबाळांना प्रेमाचे, प्रोत्साहनाचे दोन शब्द, माया, ममता, प्रेमळपणा हेच तर अपेक्षित असते. स्वकर्तृत्वावर जग जिंकता जिंकता मी माझ्या सकारात्मकतेने, हसतमुख राहून, प्रेमाचा सहवास देऊन हे माझ्या घरातलं छोटंसं जग जिंकतीये का?

लग्नाच्या अगदी सात महिन्यांच्या आतच असं काही जडजड लिहिणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखे होईल. पण म्हणतात ना कि इमारतीचा पाया अगदी भक्कम केला कि ती इमारत पुढे ऊन, वारा, पाऊस, भूकंप, सगळ्याला सामोरं जाऊन भक्कम उभी राहते. तसेच काहीसे प्रयत्न मी आणि ज्यो करतोय आणि पुढल्या आयुष्याची किमान ५० वर्षे कणखर उभी राहील अशा लग्नरूपी इमारतीचा पाया भक्कम करण्याचे प्रयत्न आम्ही प्रत्येक क्षणी, प्रत्येक दिवशी करतोय. 

प्रेमाच्या व्याख्या अगदी शेक्सपिअरपासून ते आज-उद्याकडे नावारूपाला आलेल्या अनेक लेखकांनी, कवींनी मांडल्या. पण जोपर्यंत तुम्ही स्वतःवर प्रेम करू शकत नाही, तुम्ही दुसऱ्याला प्रेम कधीच देऊ शकणार नाही. तुमच्या जोडीदाराशी तुम्ही किती प्रामाणिक आहात, यापेक्षा तुम्ही स्वतःशी प्रामाणिक आहात, त्याला आपलंसं करण्याआधी तुम्ही स्वतःला, तुमच्या भल्या-वाईट रंग-रूप, अवगुणांसकट कसं स्विकारता, एका दुसऱ्या व्यक्तीशी नातं जुळवण्याआधी तुमचं स्वतःच स्वतःशी किती सुंदर नातं आहे हे जास्त महत्वाचं, असं नाही वाटत का?

मला असं वाटतं, खरं प्रेम तेच, जे एकमेकांच्या सहवासाने बहरंत जातं. जर त्या व्यक्तीच्या सहवासात तुमची प्रगती होत असेल, तुम्हाला स्वतःविषयी प्रेम, उत्साह वाटत असेल, मला एक चांगला प्रेमळ माणूस बनायचंय हा विचार जर जोडीदाराच्या सहवासात तुमच्या मनात येत असेल, तर गुंतागुंती जीवनरूपी कोड्याचा, jigsaw puzzle चा तुमच्या आयुष्याचं चित्र पूर्ण करणारा तो हरवलेला तुकडा तुम्हाला सापडला म्हणून समजा!!                                                 


- अमृता पत्की 

   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा