मनामनांचे नाते

मनामनांचे नाते 
गुंतती कित्येक धागे 
कुणासाठी हे बंध रेशमाचे 
कुणासाठी हे नुसतेच वादे ... १

नात्यानात्यातूनच निघावा 
सूर समजुतीचा 
दुरावला तरी, परी ना तुटावा 
धागा हा रेशमाचा ... २

नकोच सीमा नात्याला 
रक्ताचे, भाषेचे नि शब्दांचेही बंधन कशाला 
नात्यानेच जपावे 
नात्यातल्या माणूसकीला ...३

भावनांचेच रुजावे नात्यात बीज 
गुंफण प्रेमाची असावी आर्त 
निमित्तही ठरावे नाममात्र 
मग जरासे श्रेय द्यावे फोन आणि फेसबूकास ....४


- मोनाली देशमुख



1 टिप्पणी: