महाराष्ट्र मंडळ सिंगापूर - वार्ता

महाराष्ट्र दिन - आनंद मेळावा खाद्योत्सव आणि खेळोत्सव

दिनांक १ मे २०१७ रोजी मंडळाने महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी सभासंदासाठी आनंद मेळावा आयोजित केला होता. ह्यामधे आंबा किंवा कैरी हा घटक पदार्थ वापरुन पाककला स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेचे परीक्षक मिशेलिन स्टार मिळवलेल्या सॉंग ऑफ इंडियाचे शेफ मंजुनाथ मुराळ होते. पाककृती स्पर्धेत राजश्री जोशी व सोनाली धोते यांना प्रथम, तर मिलन सुळे ह्यांना द्वितीय क्रमांकाचे बक्षिस मिळाले. मंडळाच्या सभासदांनी खाण्याच्या पदार्थांचे स्टॉल लावण्यासाठी भरपूर प्रतिसाद दिला. छोट्या मुलांनी सुद्धा आपले स्टॉल लावले होते. तसेच हातावर मेंदी काढणे, नेल आर्ट व खेळांचे स्टॉल होते. आनंद मेळाव्याचे अजून एक आकर्षण म्हणजे 'महाराष्ट्र' ह्या विषयावर आधारित एक प्रश्नमंजुषा होती. त्यातील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. स्वरगंध उपक्रमातील गायकांनी मिळून तीन महाराष्ट्रअभिमानपर गीते बसवली होती. कार्यक्रमाची सुरुवात या अभिमानपर गीतांनी झाली. एकूणच ह्या कायर्कमाला लहानथोर मंडळींचा भरपूर प्रतिसाद मिळाला. असे कार्यक्रम वारंवार किंवा कमीत कमी वर्षातून दोनदा तरी व्हावेत अशी मागणी काही सभादांनी केली. आनंद मेळ्याची छायाचित्रे तुम्ही मंडळाच्या फेसबुक पानावर बघू शकता. 



तीन पायांची शर्यत (मराठी नाटक) - २१ मे २०१७

एकाहून एक सरस नाटकं देणार्‍या 'सुयोग' संस्थेनिर्मित, श्री विजय केंकरे दिग्दर्शित, खुर्चीला खिळवून ठेवणारे रहस्यमय थरार नाटक 'तीन पायांची शर्यत' हे नाटक २१ मे २०१७ रोजी खू-ऑडिटोरियममधे संपन्न झाले. नाटकाला सुमारे ४०० नाटकप्रेमी आले होते. दोन अंकी तीन पात्री असलेलं हे नाटक प्रत्येक प्रवेशागणिक रंगतदार होत गेलं. रहस्यमय वातावरणाशी सुसंगत असाव असं नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना, आणि प्रत्येक पात्राच्या हालचाली ह्यामुळे रंगमंचावरुन एकही क्षण प्रेक्षकांची नजर ढळत नव्हती. चतुरस्त्र कलाकार संजय नार्वेकर ह्यांच्या बरोबरीने शर्वरी लोहोकरे आणि लोकेश गुप्ते ह्या कलावंताच्या भूमिका सिंगापूरच्या नाट्यप्रेमींना खूप आवडल्या. श्री विजय केंकरेंहस्ते 'स्वरगंध यूट्यूब चॅनेल'चे अनावरणही करण्यात आले. नाटक यशस्वी व्हायला लीना बाकरे, सत्यजित मोने, ज्योती जोशी, अमृता कशाळकर कुळकर्णी, सपना दबडे ह्या गुणी स्वयंसेवकांची फार मोलाची मदत लाभली. ह्या नाटकाची छायाचित्रे तुम्ही मंडळाच्या फेसबुक पानावर बघू शकता. 


आजीव सभासदांची सभा


बुधवार, १० मे २०१७ रोजी मंडळाच्या आजीव संभासदांची सभा घेण्यात आली. ह्यावेळी खालील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली:
१. म म सिं २०१७ - आतापर्यंत झालेले कार्यक्रम
२. या वर्षीचे आगामी कार्यक्रम व योजना
३. इतर संकीर्ण मुद्द्यांवर चर्चा


उपक्रम

हसत खेळत मराठी शाळा
६ मे २०१७ रोजी 'हसत खेळत मराठी' ह्या नवीन उपक्रमाला मंडळाने सुरुवात केली. दर शनिवारी दुपारी २ ते ४ ह्या वेळेत राबवल्या जाणार्‍या ह्या उपक्रमात आजमितीस २१ विद्यार्थी आहेत आणि तितकेच स्वयंसेवकही आहेत जे हा उपक्रम अतिशय आनंदाने, उत्साहाने व तळमळीने पुढे नेत आहेत. आपल्या पाल्यांच्या प्रगतीबद्दल पालकांकडून उत्तम प्रतिसादही मंडळापर्यंत पोहचत आहे.


६ मे २०१७ चा पहिला वर्ग - सौ. प्राजक्ती मार्कंडेय आणि सौ. नलिनी थिटे ह्यांनी घेतला
१३ मे २०१७ चा वर्ग - सौ. प्राजक्ती मार्कंडेय आणि सौ. पल्लवी कुलकर्णी ह्यांनी घेतला
२० मे २०१७ चा वर्ग - सौ. नलिनी थिटे आणि सौ. मिनल लाखे ह्यांनी घेतला
२७ मे २०१७ चा वर्ग - सौ. मिनल लाखे आणि सौ. गीता पटवर्धन ह्यांनी घेतला
३ जून २०१७ चा वर्ग - सौ. प्राजक्ती मार्कंडेय आणि सौ. केतकी पुजारी ह्यांनी घेतला
१० जून २०१७ चा वर्ग - सौ. निवेदीता फावडे आणि सौ. गीता पटवर्धन ह्यांनी घेतला

शाळेच्या प्रशासकीय समितीमधे - श्री आशिष पुजारी आणि सौ पल्लवी चिपलकट्टी आहेत.
संपर्क समितीमधे - सौ. केतकी पुजारी, सौ. प्रिया म्हैसाळकर, सौ. युगंधरा परब, श्री ओंकार बापट, सौ. अनुजा बोकिल हे सर्व आहेत.
कार्यकारिणी उपक्रम प्रमुख - सौ. नलिनी थिटे आणि सौ. प्राजक्ती मार्कंडेय आहेत

तुम्हाला तुमच्या पाल्याला ह्या शाळेत दाखल करायचे असल्यास तुम्ही www.mmsingapore.org/marathi-shala वर नावनोंदणी करु शकता.


स्वरगंध

 दिनांक १ मे २०१७ रोजी महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात स्वरगंध समितीमधील गायकांनी तीन अभिमानपर गीते बसवली होती. वीर रसातील ही गाणी श्रोत्यांना स्पर्शून गेली. तसेच, २१ मे २०१७ रोजी स्वरगंध यूट्यूब चॅनेलचे प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक श्री विजय केंकरे ह्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. ह्यावर्षी गाण्याच्या ज्या मैफली होतील त्यासाठी गायक आणि वादक ह्यांची निवडचाचणी सुरु झालेली आहे.

२०१७ च्या स्वरगंध समितीमधे सीमा ओवळेकर, सचिन भिडे, राहुल पारसनीस आणि अक्षय अवधानी आहेत. मंडळातर्फे स्वरगंध संयोजक म्हणून नलिनी थिटे या समिती वर आहेत. स्वरगंध यूट्यूब चॅनेलसाठी स्पृहा जोशी, अक्षय अवधानी, मोनल सावरकर, सचिन भिडे, रामा कृष्णन माधवनीस्वरन, पुष्कर कान्हेरे, सपना दबडे, अभिषेक अंबेडे, ह्या गुणी स्वयंसेवकांची मदत लाभली.


शब्दगंध

७ मे २०१७ रोजी काव्यवाचनाचा शब्दगंध हा कार्यक्रम झाला. हव्यास, उन्हाळा आणि गुंतता हृदय हे ((समस्यापूर्ती) ह्या विषयांवर वैविध्यपुर्ण कवितांचे वाचन झाले. जून २०१७ चा शब्दगंध कार्यक्रम १७ तारखेला घेण्यात आला. विषय होते: स्वभाव, नशीब आणि कांदा मुळा भाजी (समस्यापूर्ती).


आगामी कार्यक्रम

छोट्या मुलांकरिता अभिनय कार्यशाळा - Theatre ETC
दिनांक २२ , २३ आणि २४ जून २०१७

सहल
दिनांक १५ आणि १६ जुलै २०१७ रोजी बिनतान (ईंडोनेशिया) इथे दोन दिवस एका रात्रीसाठी सहल.
सहलीला येण्यासाठी कृपया इथे नावनोंदणी करा: https://www.mmsingapore.org/event-2581087

गणेशोत्सव
दिनांक २५ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट २०१७

स्थानिक कलाकारांचे नाटक
९ सप्टेंबर २०१७ खू ऑडिटोरियमधे

- यशवंत काकड





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा