बदलती दृष्टी

सतत सततचं सांगण थांबवा आता, 
तिला सांगण्यापेक्षा तुम्हीच धीर धरा आता! 

सरला तो आधीचा काळ, 
आता बदलत चालली आहे वेळ! 
तिला दुर्बल व्हायला शिकवण्याऐवजी, 
साक्षर अन् सबल बनवा! 
चार भिंतीच्या बाहेर पडून, 
चार वेशी ओलांडायला शिकवा! 

ती नुसतीच एक स्त्री नसून,
शक्तीचं प्रतिक आहे, 
ह्याची जाणीव कृतीतून करुन दाखवण्यासाठी, 
स्वाभीमानानं जगायला शिकवा! 

धीर धर धीर धर बोलण्याऐवजी, 
धारीष्ट्याने जगायला शिकवा!!!

- नंदिनी नागपूरकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा