आहेस

आहेस

वाटलं होतं
सोडून जाशील तेंव्हा
केवढा हल्लकल्लोळ माजेल
माझ्या चिमुकल्या आभाळात

वाटलं होतं
मी त्या प्रसंगाला तोंडच नाही देऊ शकणार

वाटलं होतं
हे होणार माहित असूनही
बसलेल्या त्या धक्क्यातून
मी नाही स्वतःला सावरू शकणार

पण तसं झालं नाही ...
लहानपणी तू सांगायचीस
त्या गोष्टींमधले अर्थ उमगले मला अचानक
जसा चेटकिणीचा जीव पोपटाच्या डोळ्यात असायचा
तसा .. खरं तर तुझा जीव माझ्या आठवणीत आहे
मी आहे .. तोपर्यंत तू आहेसच

मागच्या श्रावणात तू मला दिलेलं अत्तर
सगळ्यांना गंधवेडं करून आज संपलं
पण माहित आहे?
अत्तराचा जीव सुद्धा त्याच्या कुपीत असतो
ती कुपी आता जपून ठेवीन
ती आहे... तोपर्यंत तो गंध आहे ... आठवणी आहेत... तू ही आहेस...

जुई चितळे

1 टिप्पणी: