झाकोळ

कुंदकुंदशी दुपार
वार्‍याचा चेहरा पडलेला
निसरड्या वाटा
फुलांच्या रसानी टचटचलेल्या..

...धीर धर...
लख्ख लख्ख ऊन पडेल
गवताचे पोपटी पात वारा कापेल
वाटेवर गारशी सावली खेळेल
निळ्या निळ्या आकाशासारखं
मनावरचं मळभ दूर पळेल!

.. हा तर क्षणभराचा झाकोळ!






यशवंत काकड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा