महाराष्ट्र मंडळ सिंगापूर - वार्ता

चला हवा येऊ द्या

दिनांक शुक्रवार, ५ जानेवारी २०१८ रोजी कलांग थिएटरच्या सभागृहात चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम संपन्न झाला. मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवणार्‍या ह्या कार्यक्रमाला ६०० पेक्षा अधिक प्रेक्षकांची उपस्थिती होती. थुकतरवाडी गावातील भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, श्रेया बुगडे आणि निलेश साबळे ह्या प्रसिद्ध कलाकारांना थेट सिंगापूरात भेटण्याची संधी त्यांच्या चाहत्यांना लाभली.


संक्रांत आणि आजीव सभासदांची बैठक

शनिवार, २० जानेवारी २०१८ रोजी ग्लोबल इंडियन स्कूलमधे आजीव सभासंदाची बैठक भरवण्यात आली. ह्या बैठकीनंतर संक्रांतीचा हळदी-कुंकू आणि तिळगुळ हा कार्यक्रम संपन्न झाला. 


महाराष्ट्र मंडळ सिंगापूर आणि एस. पी. जैन - सामंजस्य करार (Memorandum of Understanding (MOU) )

बुधवार दिनांक ३ जानेवारी रोजी मंडळानी व्यवसायिक व्यवस्थापनाचे उच्च शिक्षण देण्यार्‍या एस. पी. जैन ह्या प्रसिद्ध शैक्षणिक संस्थेसोबत सामंजस्य करारावर सही केली. ह्या करारामार्फत मंडळाच्या सभासंदाना एस. पी. जैनमधील EMBA ह्या व्यावसायिक वर्गामधे प्रवेश घेताना शिष्यवृत्ती देण्यात येईल आणि इतर व्यवसायिक प्रशिक्षण मिळण्यासाठीही सभासंदांना ह्या कराराचा फायदा होईल. दिनांक २७ जानेवारी रोजी मंडळाच्या सभासंदासोबत एस. पी. जैन ह्या शैक्षणिक संस्थेने पहिले माहिती-सत्रक घेतले. 


ग्रंथालय स्टॉक-टेकिंग

दिनांक १३ जानेवारी २०१८ रोजी ग्रंथालयातील पुस्तकांचे स्टॉक टेकिंग घेण्यात आले. ह्या दिवशी ग्रंथालय बंद ठेवण्यात आले होते. नेहमीप्रमाणे अनेक स्वयंसेवकांनी 'स्टॉक टेकिंग'चे कार्य पूर्ण करण्यास मदत केली. 



क्रीडा स्पर्धा


मंडळाच्या क्रिडापटू सभासदांसाठी ४ फेब्रुवारी २०१८ रोजी बुद्धीबळ स्पर्धा घेण्यात आली. दिनांक ३ फेब्रुवारी २०१८ रोजी क्रिकेट स्पर्धा ठेवण्यात आले. १० फेब्रुवारी २०१८ रोजी बॉलिंग स्पर्धा ठेवण्यात आली आणि ११ फेब्रुवारी २०१८ रोजी बॅडमिंटन स्पर्धा होती. 




आगामी कार्यक्रम

१. वार्षिक सर्वसाधारण सभा
रविवार २५ फेब्रुवारी २०१८ 
वेळ: दुपारी ३:४५
स्थळः एस. पी. जैन, बँकेट हॉल, सिंगापूर


२. होली मेला
शनिवार ३ मार्च २०१८
वेळ: सकाळी ९:३० ते दुपारी ३:०० पर्यंत
स्थळः कोस्टा र्‍हू आणि पेबल बे कोन्डो ह्यांच्यामधे मोकळ्या मैदानावर


- यशवंत काकड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा