- प्रेम -

प्रत्येक ओठावर हा शब्द,
पण अर्थ त्याचा कळेना
जागो जागी हीच गोष्ट,
पण महत्त्व त्याचं कळेना
चुकते स्पंदन खरोखर,
की मनाचा खेळ हा कळेना
खरंच असतो त्याचा विचार सतत,
की भावनांचा मेळ हा कळेना

समुद्र आणि आकाश आहेत कोस दूर,
मग निळे प्राण गुंफले कसे कळेना
सूर्याचे तेज देते चंद्राला प्रकाश,
मग चंद्रासोबत चांदणे कसे कळेना
झाडाची पाने त्याचं सर्वस्व असतात,
मग त्यांचा त्याग इतका सोपा कसा कळेना
सर्व नदयांचा मिलाप होतो सागरात,
तेव्हा त्यांचा राग इतका सुरात कसा कळेना

डोळ्यांच्या खिडकीला दिसणारे सारे,
मनाच्या कोपऱ्यात का राहते ते कळेना
हृदयाचं प्रतिबिंब नजरेत नाही,
तेव्हा आभास का होतात ते कळेना
प्रयत्न केले खूप पण,
मनाच्या भावना काही कळेना
विचार केला सतत ह्या प्रश्यांचा,
पण प्रेम म्हणजे काय काही कळेना…..
- अनुष्का कुलकर्णी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा