बदललेली स्वातंत्र्याची परिभाषा !!!

स्वातंत्र्य म्हणजे पारतंत्र्यातून मुक्ती
आता नाही राहिली एवढीच आशा,
बदललं जग आणि बदलले लोकं
बदलली स्वातंत्र्याची परिभाषा...

वस्त्र आणि निवारा गरजेचेचं
स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येकाला शिक्षण,
पिकांना असो पाणी, खूप नको भूख
फक्त खायला अन्नाचे कण...

स्वातंत्र्य म्हणजे छोट्यांची काळजी
नेहमीच असो मोठ्यांचा मान,
स्वातंत्र्य म्हणजे नको नुसती श्रीमंती,
सगळीकडे आनंद-समभाव, नको ताण...

सक्षम सर्व वृद्ध, आया-बहिणी
स्वातंत्र्य म्हणजे नको अत्याचार,
सगळीकडे ऐक्य असावे
आजूबाजूला नको कोणी लाचार...

स्वातंत्र्य म्हणजे नवीन बदल
स्वातंत्र्य म्हणजे भरभराटीचा ध्यास,
चला बदलूया आपण सर्व
आणि घडवू एक वेगळा इतिहास

                                                                                                                         - प्रफुल्ल मुक्कावार


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा