परिवार वार्ता

सिंगापूर मध्ये २९ मे ते २ जून २०१७ या काळात नॅशनल आर्ट्स कौन्सिल तर्फे आयोजित केलेल्या नॅशनल इंडियन म्युझिक कॉम्पेटीशन मधील हिंदुस्थानी व्होकल च्या ओपन कॅटॅगिरीत अमोल रोहित परांजपे यांस द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. दर तीन वर्षांनी होणाऱ्या ह्या स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी खास भारतातून ललित राव, याेगेश समसी, बी. व्ही. बालासय, सुधा रघुनाथन, डॅा.त्रिची शंकरन, कन्नन बालक्रिष्णन सारख्या संगीत क्षेत्रातील मान्यवर परीक्षकांना बोलवण्यात आले होते. अमोलने प्रथम फेरीत राग बागेश्री तर अंतिम फेरीत राग भूपाली मधील विलंबित व द्रुत बंदिशी सादर केल्या. अमोलचे गुरू श्री. रवींद्र परचुरे यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन अमोलला लाभले.

- मृणाल रोहित परांजपे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा